पाऊस हा केसांचा सर्वात मोठा वैरी मानला जातो. कारण या दिवसात पावसाच्या पाण्यामुळे केस रखरखीत होणे, केसगळणे, केसात कोंडा होणे अशा केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत राहतात. पावसाच्या वातावरणात केसांचं आरोग्य पूर्णपणे ढासळतं. पण काही टिप्सचा वापर केला तर तुम्ही केसांची योग्य ती काळजी घेऊ शकता.
१) रात्री एक चमचा मेथी भिजवून ठेवा. सकाळी ही भिजवलेली मेथीची पेस्ट तयार करा आणि त्यात दही आणि लिंबाचा रस मिश्रित करा. ही पेस्ट १० ते १५ मिनिटांसाठी केसांवर लावा. नंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ करा आणि केसांना टॉवेलने बांधून ठेवा. हेही लक्षात ठेवा की, भिजलेल्या केसांवर कंगवा फिरवू नका.
२) चहा पावडरच्या पाण्यात लिंबाचा रस मिश्रित करून केसांवर हे पाणी टाका. याने केसांना एक नवी चमक मिळेल, सोबतच केस मुलायम होतील. तसेच याने केसगळतीची समस्या देखील दूर होईल.
३) केसांची हरवलेली चमक मिळवण्यासाठी मधाचा वापर करा. याने ना केवळ केसांना चमक मिळेल, तर केस मुलायम देखील मिळेल. मधात केसांसाठी आवश्यक असणारे पोषक तत्त्व असतात.
४) आठवड्यातून कमीत कमी एक वेळा केसांना स्टीम द्या. स्टीम घेतल्यानंतर केस कापडाने बांधून ठेवा. तसेच केस मोकळे केल्यावर लगेच कंगवा फिरवू नका. केस कोरडे झाल्यावर त्यात कंगवा फिरवा.
५) केसांना अॅलोवेराचा अनेक दृष्टीने फायदा होतो. याने केसांचा रखरखीतपणा दूर करून केसांना मुलायम केलं जातं. यातील अॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन केसांना पोषण देण्याचं काम करतात.