राज्य वरिष्ठ गट बास्केटबॉल सामने आजपासून मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:18 IST2017-12-27T00:18:08+5:302017-12-27T00:18:18+5:30

नागपूर : ६८ व्या आंतर जिल्हा राज्य वरिष्ठ गट बास्केटबॉल अजिंक्यपद सामने आज बुधवारपासून मुंबईच्या माटुंगा येथील इंडियन जिमखाना कोर्टवर रंगणार आहेत.

State senior group basketball match from today in Mumbai | राज्य वरिष्ठ गट बास्केटबॉल सामने आजपासून मुंबईत

राज्य वरिष्ठ गट बास्केटबॉल सामने आजपासून मुंबईत

नागपूर : ६८ व्या आंतर जिल्हा राज्य वरिष्ठ गट बास्केटबॉल अजिंक्यपद सामने आज बुधवारपासून मुंबईच्या माटुंगा येथील इंडियन जिमखाना कोर्टवर रंगणार आहेत.
स्पर्धेत पुरुषांचे ३४ आणि महिलांचे २१ जिल्हा संघ जेतेपदासाठी झुंज देतील. महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या मार्गदर्शनात इंडियन जिमखाना आणि डॉन बास्को माटुंगा क्लबने स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले आहे. साखळी आणि बाद फेरीतून एकाचवेळी तीन कोर्टवर सामने खेळविले जातील. अंतिम सामने १ जानेवारी रोजी खेळविले जातील. एकूण एक लाख दहा हजाराचे रोख पुरस्कार आहेत. विजेत्या दोन्ही गटातील संघांना प्रत्येकी २५ हजार, उपविजेत्या संघास प्रत्येकी १५ हजार व तिसरे स्थान मिळविणाºया संघांना प्रत्येकी १० हजार रुपये मिळतील. चौथ्या स्थानावरील संघांना प्रत्येकी ५ हजाराचा पुरस्कार दिला जाईल. याआधी वाशी येथे झालेल्या वरिष्ठ गट स्पर्धेत पुरुष गटात द. पूर्व मुंबई आणि महिला गटात उत्तर मुंबई संघ विजेते ठरले होते. या स्पर्धेतून महाराष्टÑाचे पुरुष व महिला संघ निवडले जाणार असून दोन्ही संघ चेन्नईत आयोजित राष्टÑीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे एमएसबीएचे सचिव कृष्णन मुथ्थूकुमार यांनी कळविले आहे.

Web Title: State senior group basketball match from today in Mumbai