England basketball players get engaged on court at the Commonwealth Games | ‘विल यू मॅरी मी’, मैदानातच घातली त्याने लग्नाची मागणी!
‘विल यू मॅरी मी’, मैदानातच घातली त्याने लग्नाची मागणी!

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारी आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट घडली. इंग्लंडचा बास्केटबॉल खेळाडू जेमेल अँडरसन याने आपल्या मैत्रीणीला विवाहाची मागणी घातली. ती सुद्धा बास्केटबॉल कोर्टवरच. ‘विल यू मॅरी मी’ अशी हाक देणाऱ्या जेमेलच्या मागणीला ‘तिने’ सुद्धा आनंदाने होकार दिला. जेमेलची प्रेयसी ही बास्केटबॉल खेळाडू आहे. जेमेल आपल्या गुडघ्यावर बसला आणि त्याने जॉर्जियाच्या समोर अंगठी धरून विवाहाचा प्रस्ताव ठेवला.

जॉर्जियासाठी हे सर्व सरप्राईज होते, याची तीला तसूभरही कल्पना नव्हती. त्यामुळे जेमेलने अशाप्रकारे लग्नाची मागणी घातल्याने ती फार भावुक झाली होती. जेमेलच्या अंगठीचा प्रेमाने स्वीकार करत तिने लग्नासही सर्वांसमक्ष होकार दिला. राष्ट्रकुलच्या मैदानातील या अनोख्या प्रसंगाने सगळ्यांनाच सुखद धक्का बसला.   


Web Title: England basketball players get engaged on court at the Commonwealth Games
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.