जागतिक बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 07:50 PM2018-08-04T19:50:34+5:302018-08-04T19:51:38+5:30

भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

World Badminton : Sindhu enters in final | जागतिक बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक

जागतिक बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक

ठळक मुद्देसिंधूने उपांत्य फेरीत अकाने यामागुची या खेळाडूवर 21-16, 24-22 असा विजय मिळवला.

नानजिंग (चीन) : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुची या खेळाडूवर 21-16, 24-22 असा विजय मिळवला.


सिंधू आणि यामागुची यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. पहिल्या गेममध्ये सिंधूने आक्रमक खेळ केला आणि हा गेम 21-16 असा जिंकला. यानंतर सिंधू आत्मविश्वास उंचावेल आणि ती दुसरा गेम सहज जिंकेल असे वाटत होते. पण दुसऱ्या गेममध्ये यामागुची दमदार पुनरागमन केले. या गेममध्ये दोघींची 22-22 अशी बरोबरी झाली होती. पण त्यानंतर सिंधूने सलग दोन गुण पटकावले आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.



 

Web Title: World Badminton : Sindhu enters in final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.