विश्व क्रमवारीत प्रणय १७ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 03:30 IST2017-07-29T03:30:18+5:302017-07-29T03:30:21+5:30
यएू स ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटनचा चॅम्पियन भारतीय स्टार एच. एस. प्रणय हा विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ताज्या रँकिंगमध्ये १७व्या स्थानावर पोहोचला आहे.

विश्व क्रमवारीत प्रणय १७ व्या स्थानी
नवी दिल्ली : यएू स ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटनचा चॅम्पियन भारतीय स्टार एच. एस. प्रणय हा विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ताज्या
रँकिंगमध्ये १७व्या स्थानावर पोहोचला आहे. जखमेतून परतल्यानंतर कोर्टवर आलेला पारुपल्ली कश्यप याने देखील यूएस ओपनच्या अंतिम फेरीत
स्थान निश्चित केले होते. तो देखील १२ स्थानांची झेप घेत ४७ व्या स्थानावर दाखल झाला. विश्व चॅम्पियनशिपची पात्रता गाठणारा चौथा भारतीय समीर
वर्मा यालादेखील चार स्थानांचा लाभ झाला आहे. तो २८ व्या स्थानावर पोहोचला. प्रणयने झेप घेताच आता भारताचे चार पुरुष खेळाडू जागतिक
क्रमवारीत पहिल्या २० खेळाडूंमध्ये दाखल झाले. किदाम्बी श्रीकांत हा भारतीयांमध्ये अव्वल स्थानावर असून, विश्व रँकिंगमध्ये आठव्या स्थानावर
आहे. अजय जयराम १६ व्या आणि बी साईप्रणीत १९ स्थानावर आला. महिलांमध्ये पी. व्ही. सिंधू पाचव्या स्थानावर कायम असून, सायना
नेहवालची एका स्थानाने घसरण झाल्याने ती १६ व्या स्थानावर आली.