शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Thailand Open Badminton : पी. व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 16:06 IST

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्कावर  23-21, 16-21, 21-9 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

बँकॉक - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्कावर  23-21, 16-21,  21-9 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या सामन्यात तिला जपानच्या नोझोमी ओकुहाराचा सामना करावा लागणार आहे. 

जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या सिंधूला पहिल्या गेमपासून कडवा संघर्ष करावा लागला. मारिस्काने 11-7 अशी आघाडी घेत सामन्यावर पकड बनवली होती. मात्र, सिंधूच्या मजबूत निर्धारासमोर तिला फार काळ आघाडीचा आनंद लुटता आला नाही. मारिस्काने 2-3 गुणांची आघाडी कायम राखली होती. 16-16 अशा बरोबरीनंतर सिंधूने सामन्यावर पकड घेतली. मारिस्काला एक गेम पॉईंट मिळाला होता, परंतु सिंधूने तिला गेम घेऊ दिला नाही. 27 मिनिटांच्या पहिल्या गेममध्ये सिंधूने 23-21 अशी बाजी मारली. दोन्ही खेळाडूंनी नेट प्लेसिंगचा सुरेख खेळ केला. स्मॅश मारण्यापेक्षा उंचीने कमी असलेल्या मारिस्काने नेट जवळील फटक्यांचा कल्पकतेने वापर केला. मारिस्काने न खचता सिंधूला दुस-या गेममध्ये हार मानण्यास भाग पाडले. मारिस्काने 5-9 अशा पिछाडीनंतर उत्तम खेळ करताना गेम 9-9 असा बरोबरीत आणला. त्यानंतर मारिस्काने मुसंडी मारताना 16-10 अशी आघाडी घेतली. सिंधूने त्यानंतर सहा गुणांची कमाई केली, परंतु मारिस्काने अवघ्या 19 मिनिटांत हा सेट 21-16 असा घेत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.तिस-या गेममध्ये सिंधू नेहमा दडपणात खेळते आणि त्याचाच फायदा उचलण्याची रणनिती मारिस्काने आखली होती. मात्र, सिंधूने जोरकस स्मॅश लगावले. नेट प्लेसिंगचा मोह यावेळी तिने टाळला आणि इंडोनेशियाच्या खेळाडूला संपूर्ण कोर्टवर खेळण्यास भाग पाडले. मात्र, सिंधूने केलेल्या अनफोर्स एररचा फायदा उचलत मारिस्काने सामन्यातील संघर्ष कायम राखला होता. सिंधूने 14-7 अशा आघाडीसह विजयाकडे कूच सुरूच ठेवली होती. सिंधूने स्मॅशींगचा खेळ कराताना हा गेम 21- 9 असा सहज जिंकला. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintonSportsक्रीडा