शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

दुबई ओपनमध्ये सिंधूची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 20:58 IST

भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे.

दुबई - भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. सिंधूने  अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत चीनच्या ही बिंगजीयाओचे आव्हान 21-11, 16-21, 21-18 असे परतवून लावले. त्याचवेळी, पुरुष गटात मात्र भारताची सुरुवात निराशाजनक झाली. स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत याला डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसन विरुद्ध सरळ दोन गेममध्ये पराभव पत्करावा लागला. भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने प्रतिष्ठेच्या दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली खरी, परंतु यासाठी तिला चीनच्या ही बिंगजियाओ विरुद्ध तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. गुरुवारी सिंधूपुढे जपानच्या सयाका सातो हिचे कडवे आव्हान असेल.यंदाच्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूने ही बिंगजीयाओविरुद्धच्या लढतीत दमदार सुरुवात केली. तिने पहिल्याच गेममध्ये 21-11 अशा फरकाने विजय मिळवत सामन्यात आघाडी घेतली. मात्र ही आघाडी सिंधूला टिकवता आली नाही. बिंजगिआयोने दुसऱ्या गेममध्ये 21-16 अशा फरकाने विजय मिळवत लढतीत जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर तिसऱ्या गेममध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची झुंज पाहायला मिळाली. मात्र सिंधूने अखेरच्या क्षणी आपला खेळ उंचावत गेम 21-18 अशा फरकाने जिंकला आणि सामन्यावर  21-11, 16-21, 21-18 अशा फरकाने कब्जा केला.  

दुसरीकडे, पुरुष गटात भारताच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या किदाम्बी श्रीकांतला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या व्हिक्टर एक्सेलसनविरुद्ध सलग दोन गेममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीपासून व्हिक्टरच्या वेगवान खेळापुढे पिछाडिवर पडलेल्या श्रीकांतला आपल्या पहिल्याच सामन्यात 13-21, 17-21 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेमच्या तुलनेत अदुसºया गेममध्ये झुंजार खेळ करताना श्रीकांतने आशा उंचावल्या होत्या. मात्र 11-12 अशा एका गुणाच्या आघाडीवर असलेल्या एक्सेलसनने जबरदस्त खेळ करताना आपली आघाडी 16-13 अशी वाढवली. यानंतर त्याने श्रीकांतवर अधिक दडपण आणत विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीकांतला गुरुवारी तैपईच्या चोऊ तिएन चेनविरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावेच लागेल. 

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडाIndiaभारत