नवी दिल्ली : भारताची आघाडीची शटलर पी.व्ही. सिंधू हिचा सामना विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या नोजोमी ओकुहरासोबत होऊ शकतो. ही स्पर्धा चीनच्या नानजिंगमध्ये ३० जुलैपासून सुरू होणार आहे.गेल्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचलेल्या या दोन्ही खेळाडूंचा सामना उपांत्यपूर्व फेरीत होऊ शकतो. ग्लास्गोमध्ये सिंधू आणि ओकुहरा यांच्यात अखेरीचा सामना झाला होता. गेल्या काही काळापासून ओकुहरा गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. गेल्या आठवड्यात सिंधूला थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत केले होते.स्पर्धेचा ड्रॉ आज घोषित करण्यात आला. सिंधूचा तिसऱ्या फेरीत सामना कोरियाच्या सुंग जि हून हिच्यासोबत होऊ शकतो. सायना नेहवाल हिचा सामना तिसºया फेरीत आणि उपांत्यपूर्व फेरीत अनुक्रमे थायलंडच्या रतचानोक इंतानोन आणि आॅलिम्पिक विजेती कॅरोलिना मरीन यांच्यासोबत होऊ शकतो.
सिंधूपुढे पुन्हा ओकुहाराचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 04:51 IST