शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यास सिंधू, सायना सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:28 IST

खडतर ड्रॉनंतरही भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल बुधवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भारताची जेतेपदाची दोन दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आणण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत.

बर्मिंघम : खडतर ड्रॉनंतरही भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल बुधवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भारताची जेतेपदाची दोन दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आणण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत.जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) विश्व मानांकनातील अव्वल ३२ मध्ये समावेश असलेल्या खेळाडूंना या स्पर्धेत स्थान मिळते. यावेळी भारताच्या केवळ तीन खेळाडूंना मानांकन देण्यात आले आहे. सिंधू व सायना यांच्या व्यतिरिक्त पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतला सातवे मानांकन मिळाले आहे. आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेता पाचवे मानांकन प्राप्त सिंधू १० लाख डॉलर पुरस्कार राशी असलेल्या या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात दक्षिण कोरियाची जागतिक क्रमवारीतील माजी नंबर दोन खेळाडू सुंग जी ह्यूनविरुद्ध करणार आहे.लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती व आठवे मानांकन प्राप्त सायना पहिल्या फेरीत स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरविरुद्ध खेळेल. सायनाने क्रिस्टीविरुद्ध आतापर्यंत सहाही लढतींमध्ये विजय मिळवला आहे तर सिंधू सुंग जीविरुद्ध गेल्या १४ पैकी ८ सामन्यांत विजय मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. सहा सामन्यांत तिला पराभव स्वीकारावा लागला.सिंधू पहिल्या फेरीचा अडथळा पार करण्यात यशस्वी ठरली तर दुसऱ्या फेरीत तिला रशियाच्या येवगेनिया कोसेतस्काया व हाँगकाँगची च्युंग एनगान यी यांच्यादरम्यानच्या लढतीतील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.तर सायनाला दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या लाईन होमार्क जार्सफेल्ड व चीनची काई यानयान यांच्यात लढतीतील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागले.महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी पहिल्या फेरीत शिहो तनाका व कोहारू योनेमोतो या जपानच्या सातव्या मानांकित जोडीविरुद्ध खेळतील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालPV Sindhuपी. व्ही. सिंधू