आशियाई बॅडमिंटन संघाच्या उपाध्यक्षपदी सरमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:57 IST2018-05-17T23:57:24+5:302018-05-17T23:57:24+5:30
भारतीय बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष हिमांता बिस्वा सरमा यांची निवड आशियाई बॅडमिंटन महासंघाच्या उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे.

आशियाई बॅडमिंटन संघाच्या उपाध्यक्षपदी सरमा
नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष हिमांता बिस्वा सरमा यांची निवड आशियाई बॅडमिंटन महासंघाच्या उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे.
बीएसीची वार्षिक सर्वसाधारण बैठक बँकॉक येथे पार पडली. त्यात सरमा यांची या पदावर निवड करण्यात आली. सरमा यांनी सांगितले की, ‘मी बीएससीच्या सर्व सदस्य संस्थांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याने मला हा सन्मान व जबाबदारी देण्यात आली. ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. तसेच अशियाई देशांमध्ये समन्वय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करेन.’ भारतीय बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष देवेंदर सिंग व सचिव ओमार राशिद हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते.