गुरुसाईदत्तला पराभूत करून समीर वर्मा अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 03:54 IST2018-09-09T03:54:11+5:302018-09-09T03:54:14+5:30

भारताचा आघाडीचा खेळाडू समीर वर्माने पुरुष एकेरीत आपल्या देशाच्या आर. एम. व्ही. गुरुसाईदत्तचा २-१ गेममध्ये पराभव करून हैदराबाद ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Sameer Verma in the final round defeated Gurusaidutt | गुरुसाईदत्तला पराभूत करून समीर वर्मा अंतिम फेरीत

गुरुसाईदत्तला पराभूत करून समीर वर्मा अंतिम फेरीत

हैदराबाद : भारताचा आघाडीचा खेळाडू समीर वर्माने पुरुष एकेरीत आपल्या देशाच्या आर. एम. व्ही. गुरुसाईदत्तचा २-१ गेममध्ये पराभव करून हैदराबाद ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकित समीरने ७५ हजार डॉलर्स पुरस्काराच्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत बिगर मानांकित गुरुसाईदत्तला ५१ मिनिटात्ां १६-२१, २१-१५, २१-११ गुणांनी पराभूत करून अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली.
रविवारी विजेतेपदासाठी त्याची लढत मलेशियाच्या सूंग जू वेनविरुद्ध होईल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सूंग जू वेनने सातवा मानांकित इंडोनेशियाचा फिरमान अब्दुल खोलिकला २१-१७, २१-१४ गुणांनी नमविले.

Web Title: Sameer Verma in the final round defeated Gurusaidutt