शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

प्रणॉयने दिले सायना, सिंधू यांना श्रेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:27 AM

भारताचा स्टार शटलर एच. एस. प्रणॉय याने पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे

मुंबई : भारताचा स्टार शटलर एच. एस. प्रणॉय याने पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. तो म्हणाला, की कोणत्याही सामन्यात सकारात्मक मानसिकतेने खेळण्यासाठी मला भारताच्या या दोन दिग्गज महिला खेळाडूंचा फायदा होतो. गेल्या चार-पाच वर्षांत प्रत्येक खेळाडूमध्ये एक बदल झालेला दिसून येतो, तो म्हणजे जिंकण्याचा आत्मविश्वास. पहिल्यांदा कोणत्याही विदेशी खेळाडूचे नाव पाहिल्यावर वाटायचे की विजय कठीण आहे; पण आता परिस्थिती बदललेली आहे.प्रणॉय २५ व्या जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होता. या वेळी नंदू नाटेकर आणि मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद उपस्थित होते. प्रणॉय पुढे म्हणाला की, ‘जेव्हा सायना आणि सिंधू यांनी मोठ्या स्पर्धा जिंकतानाच चिनी खेळाडूंना नमविण्यास सुरुवात केली, तेव्हा इतर खेळाडूंनाही अशा दिमाखदार पराक्रम करण्याचा विश्वास मिळाला.’