शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'फुलराणी' सायना आणि कश्यपचे झाले थाटामाटात लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 18:19 IST

भारताचा बॅडमिंटनपटू पी. कश्यपबरोबर सायनाचा आज विवाह संपन्न झाला. हे दोघेही दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

नवी दिल्ली : भारताची स्टार बॅटमिंटनपटू सायना नेहवाल आज विवाह बंधनामध्ये अडकली. भारताचा बॅडमिंटनपटू पी. कश्यपबरोबर सायनाचा आज विवाह संपन्न झाला. हे दोघेही दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण यावर्षी त्यांनी याबाबतचा खुलासा केला.

सायना आणि कश्यप ही जोडी १६ डिसेंबरला लग्न करणार, असे वृत्त आले होते. पण सायनाने आम्ही १४ डिसेंबरला लग्न करत आहोत, असे ट्विटरवर जाहीर केले होते. सायना आणि पी.कश्यप यांच्या लग्नाला जवळच्या 100 लोकांना या खास विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तसेच लग्नानंतर पाच दिवसांनी म्हणजेच रिसेप्शन सोहळा होणार आहे.

 

सायना नेहवालच्या लग्नाची पत्रिका झाली होती वायरलसायना आणि पी.कश्यप यांचे १४ डिसेंबरला लग्न झाले. पण यापूर्वी त्यांच्या लग्नाची पत्रिकाही वायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. सायना आणि पी. कश्यप हे जवळपास दहा वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र या दोघांनी कधीही आपल्या नात्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नव्हता. काही दिवसांपूर्वी सायनाने पी. कश्यपसोबत शेअर केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता.

 

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton