शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सायना इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 01:16 IST

सायनाने गेल्या वर्षीही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

जकार्ता : सायना नेहवालने शानदार फॉर्म कायम राखताना चीनच्या ही विंगजियाओचा पराभव करीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सायनाने गेल्या वर्षीही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तिने सहाव्या मानांकित बिंगजियाओची झुंज १८-२१, २१-१२, २१-१८ ने मोडून काढली. सायनाला अंतिम फेरीत तीनवेळची विश्वचॅम्पियन व ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिन किंवा चीनच्या चेन युफेई यांच्यातील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.सायनाने गेल्या वर्षीय राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, आशियन गेम्समध्ये कांस्य आणि डेन्मार्क, इंडोनेशिया मास्टर्स व सैयद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. सायना सुरुवातीला ०-२ ने पिछाडीवर होती, पण काही चांगले फटके लगावत तिने ५-५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सायनाने ८-६ अशी आघाडी घेतली, पण बिंगजियाओने ब्रेकनंतर पुनरागमन करताना १७-१८ असा स्कोअर केला. सायनाचा फटका कोर्टबाहेर गेल्यामुळे बिंगजियाओने पहिला सेट २१-१८ ने जिंकला.दुसऱ्या गेममध्ये सायनाने आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या चुकीचा लाभ घेत सुरुवातीलाच ११-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर बिंगजियाओने सलग चार गुण वसूल केले. सायनाने क्रॉसकोर्टवर शानदार रिटर्नच्या मदतीने १७-९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर चार गुण वसूल करील दुसरा गेम जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. अखेरच्या गेममध्ये सायनाने कामगिरीत सातत्य राखताना बिंगजियाओला कुठली संधी दिली नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton