शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

ताय ज्यू यिंगकडून सायना पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 04:44 IST

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल शुक्रवारी पुन्हा एकदा तायवानची ताय ज्यू यिंग हिच्याकडून पराभूत होताच ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

बर्मिंघम : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल शुक्रवारी पुन्हा एकदा तायवानची ताय ज्यू यिंग हिच्याकडून पराभूत होताच ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.दहा लाख डॉलर रोख पुरस्कार रकमेच्या या स्पर्धेत सायनाला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ताय ज्यू ने ३७ मिनिटांत १५-२१, १९-२१ ने पराभूत केले. उभय खेळाडूंमध्ये झालेल्या २० पैकी केवळ पाच सामन्यांत सायनाने बाजी मारली आहे. ताय ज्यूने सायनाविरुद्ध ओळीने १३ सामने जिंकून एकूण १५ विजयांची नोंद केली आहे.सायनावर तिने पहिल्या गेममध्ये ११-३ अशी आघाडी घेतली होती. नंतर सायनाने १२ पैकी नऊ गुण संपादन करीत १४-१२ अशी पिछाडी भरून काढली. ताय ज्यू ने आघाडी वाढवून २०-१३ अशी केली व पाठोपाठ गेम जिंकला. प्रतिस्पर्धी खेळाडूची दमदार कामगिरी दुसऱ्या गेममध्येही कायम राहिली. तिने ११-८ अशी प्रारंभी आघाडी मिळविली होती. सायनानेदेखील प्रतिकार केल्यामुळे गुणफलक १७-१५ आणि थोड्याच वेळात १९-१९ असा झाला. ताय ज्यू ने सलग दोन गुणांची कमाई करीत गेम आणि सामना जिंकला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवाल