पीबीएल : नॉर्थईस्ट वॉरीयर्स संघाचा दमदार विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:50 IST2018-01-06T01:49:58+5:302018-01-06T01:50:09+5:30

येथील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) सामन्यात नॉर्थ ईस्ट वॉरीयर्सने बंगळुरू ब्लास्टर्सचा ३-२ ने पराभव केला.

 PBL: Predictable victory of Northeast Warriors | पीबीएल : नॉर्थईस्ट वॉरीयर्स संघाचा दमदार विजय

पीबीएल : नॉर्थईस्ट वॉरीयर्स संघाचा दमदार विजय

- आकाश नेवे
चेन्नई : येथील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) सामन्यात नॉर्थ ईस्ट वॉरीयर्सने बंगळुरू ब्लास्टर्सचा ३-२ ने पराभव केला. बंगळुरूचे इतर खेळाडू पराभूत होत असताना व्हिक्टर अलेक्सेनसेन याने वेंग वेई याचा ९-१५, १५-१३, १५-१४ असा पराभव केला.
पहिल्या पुरूष दुहेरीच्या सामन्यात बंगळुरूच्या बोइ आणि मान यांनी जुआ आणि चेल यांना १५-१२, ७-१५, १५-१२ असे पराभूत केले. यानंतर अजय जयरामने वॉरीयर्सला बरोबरी साधून देताना चोंग वेइ फेंग याचा सरळ गेममध्ये १५-८, १५-१३ असा पराभव केला. या ट्रम्प सामन्यातील पराभवाने बंगळुरूला एका गुणाचे नुकसान सहन करावे लागल्याने ते ०-२ असे पिछाडीवर पडले.
महिला एकेरीत मिशेल ली हिने आपल्या ट्रम्प लढतीत अपेक्षित निकाल लावताना बंगळुरुच्या किरस्टी गिलमोर हिचा ७-१५, १५-१४, १५-१३ असा पराभव करत संघाला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. यानंतर केवळ औपचारिकता राहिलेल्या पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीत बंगळुरुने बाजी मारली खरी, परंतु ट्रम्प लढत गमावल्याने त्यांना सामन्यात पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत व्हिक्टरने बाजी मारल्यानंतर मिश्र दुहेरीत मनु अत्री - एन. सिक्की रेड्डी यांनी नॉर्थइस्टच्या शिनबेक चेओल - प्राजक्ता सावंत यांचा १२-१५, १५-८, १५-९ असा पराभव केला.

Web Title:  PBL: Predictable victory of Northeast Warriors