न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन : साईप्रणित उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 01:58 IST2018-05-05T01:58:42+5:302018-05-05T01:58:42+5:30

बी. साईप्रणित याने पुरुष एकेरीत न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. स्पर्धेत आव्हान टिकविणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला. तिसरा मानांकित प्रणितने श्रीलंकेचा तिलुका करुणारत्ने याला २६ मिनिटांत २१-७, २१-९ असे पराभूत केले.

New Zealand Open Badminton: Saina Ranade in semifinals | न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन : साईप्रणित उपांत्य फेरीत

न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन : साईप्रणित उपांत्य फेरीत

आॅकलंड : बी. साईप्रणित याने पुरुष एकेरीत न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. स्पर्धेत आव्हान टिकविणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला. तिसरा मानांकित प्रणितने श्रीलंकेचा तिलुका करुणारत्ने याला २६ मिनिटांत २१-७, २१-९ असे पराभूत केले.
उपांत्य सामन्यात तो इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टी याच्याविरुद्ध खेळणार आहे. पाचवा मानांकित समीर वर्मा हा मात्र दोन वेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन लिन डॅन याच्याकडून पराभूत झाला. डॅनच्या आक्रमक सर्व्हिसचा सामना करणाऱ्यात अपयशी ठरलेल्या समीरला १९-२१,९-२१ ने पराभवाचे तोंड पहावे लागले. डॅनचा सामना कोरियाचा वानग हियो याच्याविरुद्ध होईल. पुरुष दुहेरीत मनू अत्री- बी. सुमित रेड्डी हे उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले. थायलंडची जोडी बोडिन इसारा- एन. फुआंगफुआपेन यांनी त्यांच्यावर २१-१०,२१-१५ असा विजय साजरा केला. (वृत्तसंस्था)

Web Title: New Zealand Open Badminton: Saina Ranade in semifinals