मलेशिया ओपन : दिग्गजांचे चांगल्या कामगिरीवर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 07:01 IST2018-06-26T07:01:26+5:302018-06-26T07:01:34+5:30
एका महिन्याच्या विश्रांतीनंतर ताजेतवाने झालेल्या पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतसह भारताचे आघाडीचे खेळाडू उद्या मलेशिया ओपनमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या वज्रनिर्धाराने खेळणार आहेत.

मलेशिया ओपन : दिग्गजांचे चांगल्या कामगिरीवर लक्ष
क्वालालम्पूर : एका महिन्याच्या विश्रांतीनंतर ताजेतवाने झालेल्या पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतसह भारताचे आघाडीचे खेळाडू उद्या मलेशिया ओपनमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या वज्रनिर्धाराने खेळणार आहेत.
व्यस्त हंगामाआधी पूर्णपणे तंदुरुस्त राहता यावे या हेतूने श्रीकांत आणि सिंधूने मे महिन्यात थॉमस व उबेर चषक फायनल्समध्ये सहभाग घेतला नव्हता. आता आगामी हंगाम हा खूप व्यस्त आहे. त्यात इंडोनेशिया ओपन, थायलंड ओपन आणि सिंगापूर ओपनसारख्या स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर आशियाई स्पर्धा होणार आहेत.
श्रीकांत आणि सिंधू चांगल्या लयीत आहेत आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ते सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरले होते; परंतु त्यानंतर त्यांना फिटनेसवर कठोर
मेहनत घ्यावी लागली. चौथ्या मानांकित श्रीकांत पहिल्या सत्रातील विजेतेपद जिंकण्याची सुरुवात जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित खेळाडू डेन्मार्कच्या के
यान ओ योर्गेनसन याच्याविरुद्ध लढतीने करेल.
सिंधूने गेल्या वर्षी तीन स्पर्धांत विजेतेपद पटकावले होते आणि तीन स्पर्धांत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यात विश्व चॅम्पियनशिप आणि दुबई सुपर सिरीजचा समावेश आहे. इंडिया ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावणारी सिंधू
पहिल्या फेरीत आया ओहोरी हिच्याविरुद्ध खेळेल तर उपांत्यपूर्व फेरीत तिचा
सामना आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिनशी होऊ शकतो. लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदकप्राप्त आणि या वर्षी इंडोनेशिया ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावणाऱ्या सायना नेहवाल हिची पहिल्या
फेरीत हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिच्याविरुद्ध लढत होईल.