शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 07:03 IST

विश्वविजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

क्वालालम्पूर : विश्वविजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सहाव्या मानांकित सिंधूने जपानची अया ओहोरी हिच्यावर केवळ ३४ मिनिटात २१-१०, २१-१५ अशा फरकाने मात केली. सिंधूचा ओहोरीवर हा सलग नववा विजय होता. मागच्या वर्षी बासेल येथे विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या २४ वर्षांच्या सिंधूला आता उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली चायनीज तैपईची ताय ज्युंग आणि द. कोरियाची सिंग हून यांच्यात होणाºया लढतीतील विजेत्या खेळाडूंविरुद्ध झुंज द्यावी लागेल.सायनाने द. कोरियाची आन सेयंगविरुद्ध रोमहर्षक झालेली लढत ३९ मिनिटांत २५-२३, २१-१२ अशी जिंकली. द. कोरियाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर सायनाचा हा पहिलाच विजय होता. मागच्या वर्षी फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व सामन्यात सायना सेयंगकडून पराभूत झाली होती. सायनाची उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडेल ती आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिनविरुद्ध.दुसरीकडे, पुरुष एकेरीत समीर वर्मा दुसºया फेरीत पराभूत झाला. त्याला मलेशियाचा ली जिया याच्याकडून १९-२१, २०-२२ असा पराभवाचा फटका बसला. (वृत्तसंस्था )

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालPV Sindhuपी. व्ही. सिंधू