ज्युनिअर विश्व चॅम्पियनशिपमध्ये लक्ष्य सेनचे कांस्य पदकावर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 02:29 AM2018-11-19T02:29:31+5:302018-11-19T02:29:43+5:30

शानदार विजयी घोडदौड केलेल्या भारताच्या लक्ष्य सेन याला विश्व ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अखेर कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

Lakshya Sen bronze medal in junior world championship | ज्युनिअर विश्व चॅम्पियनशिपमध्ये लक्ष्य सेनचे कांस्य पदकावर समाधान

ज्युनिअर विश्व चॅम्पियनशिपमध्ये लक्ष्य सेनचे कांस्य पदकावर समाधान

Next

मार्कहॅम : शानदार विजयी घोडदौड केलेल्या भारताच्या लक्ष्य सेन याला विश्व ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अखेर कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत त्याला थायलंडच्या अव्वल मानांकित कुनलावुत वितिदसार्नविरुद्ध चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.
यावर्षी आशियाई स्पर्धेत ज्युनिअर गटात विजेतेपद पटकावणाऱ्या लक्ष्य सेन याला शनिवारी एक तास ११ मिनिटे रंगलेल्या लढतीत पहिला गेम जिंकल्यानंतरही २२-२0, १६-२१, १३-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. पहिला गेम जिंकून आश्वासक सुरुवात केलेल्या लक्ष्यला यानंतर आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात यश आले नाही.
ज्युनिअर विश्व रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित खेळाडू लक्ष्य म्हणाला, ‘पहिला गेम जिंकण्यात यशस्वी ठरल्यानंतरही मी लय मिळवू शकलो नाही. दुसरा गेम खूप चुरशीचा होता. मी माझ्या मजबूत बाजूनुसार खेळू शकलो नाही आणि प्रतिस्पर्ध्याजवळ माझ्या सर्व फटक्यांचे उत्तर होते.’
लक्ष्यने चांगली सुरुवात करत पहिला चुरशीचा गेम जिंकला. दुसºया गेममध्ये थायलंडच्या खेळाडूने मुसंडी मारत १-१ अशी बरोबरी साधली. दुसरा गेम गमावल्यानंतर भारतीय खेळाडू आव्हान देऊ शकला नाही आणि कुनलावुत याने तिसरा आणि निर्णायक गेम सहजपणे जिंकताना अंतिम फेरी गाठली. (वृत्तसंस्था)

सायना नेहवाल ठरली एकमेव भारतीय
या स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी एकमेव खेळाडू सायना नेहवाल आहे. सायनाने २००८ मध्ये पुणे येथील स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावताना हे यश मिळवले होते.

Web Title: Lakshya Sen bronze medal in junior world championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton