शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरिया ओपन: कश्यपने झुंजार विजयासह गाठली उपांत्यपूर्व फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:55 IST

एकेरीत मलेशियाच्या डेरेन लियूवर मात

इंचियोन : भारताचा स्टार खेळाडू पारुपल्ली कश्यप याने गुरुवारी मलेशियाच्या डेरेन लियू याच्यावर तीन गेममधील सामन्यात मात करीत कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण विजेता कश्यपने ५६ मिनिटांच्या खेळात डेरेन लियूवर २१-१७, ११—२१,२१-१२ ने विजय साजरा केला.हैदराबादच्या ३३ वर्षांच्या कश्यपचा पुढील सामना डेन्मार्कचा जॉन ओ जोर्गेन्सन याच्याविरुद्ध होईल. पाच वर्षांआधी डेन्मार्क ओपनमध्ये उभय खेळाडूंमध्ये लढत झाली होती. कश्यपचा २०१५ चा विश्व चॅम्पियन जोर्गेन्सन विरुद्धचा रेकॉर्ड २-४ असा आहे. डेन्मार्कचा ३१ वर्षांच्या जोर्गेन्सनने इंडोनेशियाचा अँथोनी सिनिसुका जिंटिंग याला ५८ मिनिटात १७-२१, २१-१६, २१-१३ ने पराभूत केले. जोर्गेन्सनविरुद्ध खेळण्याआधी कश्यप म्हणाला, ‘हा चांगला सामना होईल. जिनटिंगला नमविल्याने जोर्गेन्सन फॉर्ममध्ये आहे. हा सामना कठीण असेल.’ या स्पर्धेत आघाडीचे सर्व खेळाडू पराभूत झाल्यानंतर भारताचे आव्हान सादर करणारा कश्यप एकमेव खेळाडू आहे. विश्वविजेती सिंधू पहिल्या फेरीत पराभूत झाली. सायना नेहवालला पोटाच्या विकारामुळे अर्ध्यावर माघार घ्यावी लागली. विश्व स्पर्धेचा कांस्य विजेता बी. साईप्रणीत हाही सलामीच्या लढतीतून दुखापतीमुळे निवृत्त झाला होता. (वृत्तसंस्था)दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला माझा खेळ बहरला. पण लियूने झुंजवले. त्याने आघाडीही मिळवली. ही आघाडी वाढत गेल्याने बरोबरी साधणे कठीण झाले. तिसºया गेममध्ये वेगवान फटके मारत आघाडी घेतली. लियूवर वर्चस्व राखल्यानेच विजय मिळाला. - पी. कश्यप