Korea Open Badminton: Kidambi Srikanth, Sameer in Second Round | कोरिया ओपन बॅडमिंटन: किदाम्बी श्रीकांत, समीर दुसऱ्या फेरीत
कोरिया ओपन बॅडमिंटन: किदाम्बी श्रीकांत, समीर दुसऱ्या फेरीत

ग्वांगझू : कोरिया ओपन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताने शानदार सुरुवात केली. किदाम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनी बुधवारी पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली.

सहावा मानांकित श्रीकांतने हाँगकाँगचा वोंग विंगकी विन्सेंट याच्यावर २१-१८,२१-१७ ने मात केली. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू श्रीकांतचा हाँगकाँगच्या खेळाडूविरुद्धचा जय- पराजयाचा रेकॉर्ड ११-३ असा आहे. त्याची पुढील लढत जपानचा केंता सुनेयामा याच्याविरुद्ध होईल. समीरविरुद्ध जपानचा काजुमासा सकाई याने ही लढत अर्ध्यावर सोडून दिली. त्यावेळी समीर ११-८ ने पुढे होता. समीर दुसºया फेरीत डोंगूनविरुद्ध खेळणार आहे.

त्याचवेळी, सौरभ वर्मा याला मात्र पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. स्थानिक खेळाडू किम डोंगून याने सौरभवर २१-१३, १२-२१, १३-२१ ने मात केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Korea Open Badminton: Kidambi Srikanth, Sameer in Second Round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.