जयराम, मिथुन उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 03:15 IST2018-08-11T03:15:42+5:302018-08-11T03:15:50+5:30
अजय जयराम व मिथुन मंजुनाथ यांनी शुक्रवारी संघर्षपूर्ण लढतींमध्ये बाजी मारत व्हिएतनाम ओपन सुपर टूर १०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

जयराम, मिथुन उपांत्य फेरीत
हो ची मिन्ह सिटी : अजय जयराम व मिथुन मंजुनाथ यांनी शुक्रवारी संघर्षपूर्ण लढतींमध्ये बाजी मारत व्हिएतनाम ओपन सुपर टूर १०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
जयरामने कॅनडाच्या शेंग झियाडोंगचा २६-२४, २१-१७ ने पराभव केला. या ३० वर्षीय भारतीय खेळाडूला उपांत्य फेरीत जपानाच्या सातव्या मानांकित यु इगाराशीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
अन्य लढतीत युवा बॅडमिंटनपटू मिथुनने चीनच्या झोऊ जेक्कीची झुंज १७-२१, २१-१९, २१-११ ने मोडून काढली. ही लढत ५६ मिनिट रंगली. आता मिथुनला इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितोसोबत उपांत्य फेरीत लढत द्यावी लागेल. महिला एकेरीत मात्र माजी राष्ट्रीय विजेती ऋतूपर्णा दासला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या फिटयापोर्न चाईवानविरुद्ध
१९-२१, १४-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.