भारतीय बॅडमिंटनपटू प्रणय, प्रणितची फ्रेंच ओपनमध्ये विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:15 IST2017-10-26T00:15:48+5:302017-10-26T00:15:59+5:30
पॅरिस : भारतीय बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणय आणि बी साईप्रणित यांनी बुधवारी पुरुष एकेरीत संघर्षपूर्ण विजयाची नोंद करीत फ्रेंच ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत धडक दिली.

भारतीय बॅडमिंटनपटू प्रणय, प्रणितची फ्रेंच ओपनमध्ये विजयी सलामी
पॅरिस : भारतीय बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणय आणि बी साईप्रणित यांनी बुधवारी पुरुष एकेरीत संघर्षपूर्ण विजयाची नोंद करीत फ्रेंच ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत धडक दिली.
यूएस ओपन चॅम्पियन प्रणयने डेन्मार्क ओपनची अंतिम फेरी गाठणारा कोरियाचा ३७ वर्षांचा खेळाडू अनुभवी ली हून याच्यावर २१-१५, २१-१७ ने विजय साजरा केला. प्रणितने मागच्या आठवड्यात सुरुवातीला झालेल्या पराभवाचा वचपा काढताना थायलंडचा खोसित फेतप्रदाबवर २१-१३, २१-२३, २१-१९ ने विजय नोंदविला. प्रणितचा सामना आता आॅलिम्पिकचा तीनदा रौप्यविजेता असलेला सातवा मानांकित मलेशियाचा ली चोंग वेई याच्याविरुद्ध होईल. या मोसमात दोन वेळा ली चोंग वेईवर विजय नोंदविणाºया प्रणयची लढत मात्र डेन्मार्कचा ख्रिस्टियन सोलबर्गविरुद्ध होणार आहे. प्रणय जेरी चोप्रा
आणि एन. सिक्की रेड्डी या मिश्र जोडीला इंडोनेशियाची जोडी तोंतोवी अहमद आणि लिलियाना नातसिर या चौथ्या मानांकित जोडीकडून १५-२१, १२-२१ ने पराभवाचे तोंड पाहावे लागले. (वृत्तसंस्था)