इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत, इंतानोनवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 05:26 IST2018-02-04T05:26:23+5:302018-02-04T05:26:37+5:30
गत चॅम्पियन आणि अव्वल मानांकित भारताच्या पी. व्ही. सिंधूने आज येथे थायलंडच्या तृतीय मानांकित रतचानोक इंतानोन हिच्यावर रोमहर्षक लढतीत सरळ गेममध्ये विजय मिळवताना सलग दुस-यांदा इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीत अंतिम फेरीत धडक मारली.

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत, इंतानोनवर मात
नवी दिल्ली : गत चॅम्पियन आणि अव्वल मानांकित भारताच्या पी. व्ही. सिंधूने आज येथे थायलंडच्या तृतीय मानांकित रतचानोक इंतानोन हिच्यावर रोमहर्षक लढतीत सरळ गेममध्ये विजय मिळवताना सलग दुस-यांदा इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीत अंतिम फेरीत धडक मारली.
आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त सिंधूने सिरी फोर्ट क्रीडाग्राममध्ये जवळपास एक तास चाललेल्या उपांत्य फेरीत आक्रमक खेळ करताना माजी वर्ल्डचॅम्पियन थायलंडच्या तृतीय मानांकित इंतानोन हिचा ४८ मिनिटांत २१-१३, २१-१५ असा पराभव केला. इंतानोनविरुद्ध सिंधूचा हा सलग दुसरा विजय आणि सात सामन्यात एकूण तिसरा विजय आहे. तिला चार वेळेस पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम फेरीत तिची लढत अमेरिकेच्या पाचव्या मानांकित बेईवान झेंग हिच्याविरुद्ध होईल.