शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

‘मला जोरदार पुनरागमन करावेच लागेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:39 AM

भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिला आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या रोमांचक उपांत्य फेरीच्या सामन्यात जगातील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू अकाने यामागुची हिच्याकडून पराभव पत्करावा लागला.

बर्मिंगहॅम : भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिला आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या रोमांचक उपांत्य फेरीच्या सामन्यात जगातील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू अकाने यामागुची हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यावर रविवारी सिंधू म्हणाली की, ‘मला आता जोरदार पुनरागमन करावेच लागेल.’शनिवारी रात्री चौथ्या मानांकित सिंधूला एक तास १९९ मिनिटे चाललेल्या या लढतीत २१-१९, १९-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. सिंधू म्हणाली की, हा माझा दिवस नव्हता. मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला. उतार-चढाव हे सुरूच असतात आणि एकाचाच विजय होतो. यात लांब रॅलीज् होत्या आणि ती चांगली खेळली. तीन गेमचा सामना जिंकणे सोपे नसते. अखेरच्या क्षणी २-३ गुणांचे अंतर मोठे वाटते. या स्पर्धेतून मला खूप काही शिकायला मिळाले. ही स्पर्धा माझ्यासाठी चांगली राहिली आणि मला जोरदार पुनरागमन करावे लागेल.’ यामागुची म्हणाली, ‘विजय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली. मी अखेरपर्यंत आक्रमक खेळ केला. यामुळेच मी विजय मिळवण्यात यशस्वी ठरली.’