भारताचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 02:34 IST2018-07-20T02:34:03+5:302018-07-20T02:34:28+5:30

सौरभ वर्मासह अन्य भारतीय खेळाडूंच्या पराभवानंतर भारतीय संघाचे सिंगापूर ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

Due to India's challenge | भारताचे आव्हान संपुष्टात

भारताचे आव्हान संपुष्टात

सिंगापूर : सौरभ वर्मासह अन्य भारतीय खेळाडूंच्या पराभवानंतर भारतीय संघाचे सिंगापूर ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे.
व्हिएतनामच्या तियेन मिन्ह एंगुयेन याने भारताच्या सौरभ वर्मा याला १८-२१, २१-१५, २१-११ असे पराभूत केले. पहिला गेम गमावल्यानंतर सौरभने चांगले पुनरागमन केले होते. मात्र, अंतिम गेममध्ये एंगुयेन याने जबरदस्त आक्रमण करताना सौरभला संधी दिली नाही. अन्य लढतीत इंडोनेशियाच्या युलिया योसेफिन सुशांतोने रितुपर्णा दासचा १५-२१, २१-१३, २१-१६ असा पराभव केला.
मिश्र दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांना हाँगकाँगच्या सातव्या मानांकित ली चुन हेइ आणि चाउ होइ वाह यांनी २१-१४, १६-२१, २१-१४ असे पराभूत केले. अन्य लढतीत चिनी ताइपेच्या अव्वल मानांकित तियेन चेन चोउ याने शुभांकर डे याच्यावर २१-१३, २१-१४ असा विजय मिळविला. 

Web Title: Due to India's challenge

टॅग्स :BadmintonBadminton