दुबई सुपर सीरिज : पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांतची नजर जेतेपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:31 IST2017-12-12T23:31:32+5:302017-12-12T23:31:56+5:30
आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुबई सुपर सीरिज फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनसाठी शानदार ठरलेल्या या वर्षाचा शेवट जेतेपदासह करण्यास उत्सुक आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महिला व पुरुष विभागात जगातील अव्वल आठ खेळाडू सहभागी होतात.

दुबई सुपर सीरिज : पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांतची नजर जेतेपदावर
दुबई : आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुबई सुपर सीरिज फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनसाठी शानदार ठरलेल्या या वर्षाचा शेवट जेतेपदासह करण्यास उत्सुक आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महिला व पुरुष विभागात जगातील अव्वल आठ खेळाडू सहभागी होतात.
जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानावर असलेली सिंधू आणि चौथ्या स्थानावर असलेला श्रीकांत आपल्या मोहिमेची सुरुवात अनुक्रमे चीनची बिंगजियाओ व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसेन यांच्याविरुद्ध करणार आहेत.
सिंधू व श्रीकांत यांची यंदाच्या मोसमातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. सिंधूने इंडिया ओपन व कोरिया ओपन यामध्ये जेतेपद
पटकावण्याव्यतिरिक्त ग्लासगो विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले. गेल्या महिन्यात हाँगकाँग ओपनमध्ये ती उपविजेती होती.
श्रीकांत एका कॅलेंडर वर्षांत चार सुपर सिरिज जेतेपद पटकावणारा भारताचा एकमेव आणि जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. त्याने इंडोनेशिया ओपन, आॅस्ट्रेलिया ओपन, डेन्मार्क ओपन व फ्रेंच ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावले तर जांघेतील स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला चायना ओपन व हाँगकाँग ओपनमध्ये सहभागी होता आले नाही. महिनाभराच्या ब्रेकमध्ये त्याने फिटनेस व तंत्रावर बरीच मेहनत घेतली. पुन्हा तोच फॉर्म गवसेल, अशी त्याला आशा आहे.
श्रीकांत म्हणाला, ‘ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. २०१४ मध्ये मी येथे उपांत्य फेरी गाठली होती, पण २०१५ मध्ये साखळी फेरीतच पराभूत झालो होता. त्याचा यावेळी काही फरक पडणार नाही. पराभव विसरून आगेकूच करावी लागेल. यंदा चांगली कामगिरी होईल, अशी आशा आहे.’ श्रीकांतला पुरुष एकेरीत ‘ब’ गटात एक्सेलसेनव्यतिरिक्त चोऊ तियेन चेन व शि युकी यांच्यासह स्थान मिळाले आहे. (वृत्तसंस्था)