आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन : साईप्रणित, समीर वर्मा दुसऱ्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:49 IST2018-05-10T00:49:17+5:302018-05-10T00:49:17+5:30

दुसरा मानांकित भारतीय बॅडमिंटनपटू बी. साईप्रणित आणि चौथा मानांकित समीर वर्मा यांनी आश्वासक सुरुवात करीत बुधवारी सुरू झालेल्या आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

Australian Open badminton: Sai Praneeth and Sameer Verma in the second round | आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन : साईप्रणित, समीर वर्मा दुसऱ्या फेरीत

आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन : साईप्रणित, समीर वर्मा दुसऱ्या फेरीत

सिडनी : दुसरा मानांकित भारतीय बॅडमिंटनपटू बी. साईप्रणित आणि चौथा मानांकित समीर वर्मा यांनी आश्वासक सुरुवात करीत बुधवारी सुरू झालेल्या आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.
प्रणितने इस्रायलचा मिशा जिल्बरमॅन याचा सरळ गेममध्ये २१-१७,२१-१४ ने पराभव केला. समीरला मात्र न्यूझीलंडचा अभिनव मनोता याचा १३-२१, २१-१७,२१-१२ ने पराभव करण्यास बराच घाम गाळावा लागला.
समीरचा भाऊ सौरभ वर्मा हा
कडव्या संघर्षात जपानचा ताकुमा उएदा याच्याकडून २१-१९, १७-२१, १२-२१ ने पराभूत झाला. बिगर मानांकित अजय जयराम यालादेखील जपानचा रिची ताकेशिता याच्याकडून एक तास १२ मिनिटांत २२-२०,२०-२२,१७-२१ ने पराभव पत्करावा लागला. अन्य एका लढतीत करण राजन हा इंडोनेशियाच्या डुबी कुनकोरा याच्याविरुद्ध १५-२१, ८-२१ अशा गुणांनी सरळ दोन गेममध्ये पराभूत झाला. (वृत्तसंस्था)

सायना आणि सिंधू या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत वैष्णवी रेड्डी ही महिला एकेरीत दुसरी फेरी गाठणारी एकमेव भारतीय ठरली. तिने इंग्लंडची जाजीना ब्लेंड हिच्यावर १९-२१,२१-१५,२१-१५ ने विजय नोंदविला.

पुरुष दुहेरीत मनु अत्री-बी. सुमित रेड्डी यांनी लुकास डेफोल्की-मायकेल फरिमन यांचा २१-११, २१-१० ने तसेच श्लोक रामचंद्रन-अर्जुन एम.आर. यांनी रेमंड टेम-एरिक वुयोग यांचा २१-७,२१-१५ ने पराभव केला.

Web Title: Australian Open badminton: Sai Praneeth and Sameer Verma in the second round