शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'पेट्रोलचे भरपूर पैसे वाचतायेत'; जगातील सर्वात अनोखी कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 17:27 IST

world smallest car : कारची लांबी 134 सेमी, रुंदी 98 सेमी आणि उंची 100 सेमी आहे. कारला 3 चाके आहेत. ब्रिटनच्या Peel Engineering कंपनीने ही कार तयार केली आहे.

जगातील सर्वात लहान कार Peel P50. या कारची लांबी फक्त 134 सेंटीमीटर (4.3 फूट) आहे. तर पेट्रोल टाकी फक्त 5 लीटर आहे. कारच्या मालकाचे म्हणणे आहे की, छोट्या कारमुळे लोक त्यांची चेष्टा करतात, पण या कारमधून खूप मोठी बचत होते. अॅलेक्स ऑर्चिन असे कारच्या मालकाचे नाव आहे. ते 31 वर्षांचे आहेत. ब्रिटनमधील ससेक्स शहरात दैनंदिन कामासाठी ते या कारचा वापर करतात. त्यांची ही कार निळ्या रंगाची आहे. अॅलेक्स ऑर्चिन म्हणतात की, कारची खिल्ली उडवणाऱ्या लोकांसाठी त्यांची कार सर्वात किफायतशीर आहे. कार सुमारे 42 kmpl चा मायलेज देते.

कारची लांबी 134 सेमी, रुंदी 98 सेमी आणि उंची 100 सेमी आहे. कारला 3 चाके आहेत. ब्रिटनच्या Peel Engineering कंपनीने ही कार तयार केली आहे. यात 4.5  horsepower engine आहे. ही कार 1962 ते 1965 या काळात तयार करण्यात आली होती. नंतर 2010 मध्ये कार पुन्हा तयार करण्यात आली. या वन सीटर कारमध्ये सूटकेस ठेवायलाही जागा नाही. यामुळे,अॅलेक्स यांना स्टीयरिंगच्या एका बाजूला आपले पाऊल अॅडजेस्ट करावे लागतात. त्यांनी सांगितले की, जेरेमी क्लार्कसनला टॉप गियर शोमध्ये ही कार चालवताना पाहिले. त्यानंतर त्यांना ही कार खूप आवडली. गेल्या वर्षी त्यांनी या कारमधून संपूर्ण ब्रिटनचा दौरा केला होता. कारचा टॉप स्पीड फक्त 37 किमी/तास आहे. 

अॅलेक्स म्हणाले, मला लहानपणापासून जुन्या, विंटेज आणि वेगळ्या दिसणाऱ्या कार आवडतात. मला विंटेज कार चालवायला आवडते. माझ्याकडे 1914 मॉडेल टी आणि 1968 ची मॉरिस मायनर कार देखील आहे. P50 कार मला तिच्या लहान आकारामुळे खूप आवडली. पण जेव्हा मी तिची मूळ किंमत पाहिली तेव्हा माझे होश उडाले. तिची किंमत 84 लाखांपेक्षा जास्त होती. नंतर मी माझ्या शहरातील एका व्यक्तीकडून सेकंड हँड कार विकत घेतली. याचबरोबर, ही कार नेहमीच लोकांना आकर्षित करते. जो कोणी पाहतो तो मला सांगतो की ती तुमच्यापेक्षा लहान आहे. मी कारच्या हँडब्रेकजवळ फक्त शॉपिंग बॅग ठेवू शकतो, असे अॅलेक्स यांनी सांगितले.  दरम्यान, P50 कारचे उत्पादन 1960 मध्ये सुरू झाले होते. 2010 मध्ये, ती जगातील सर्वात लहान कार म्हणून घोषित करण्यात आली. या कारचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

टॅग्स :carकारAutomobileवाहनbusinessव्यवसायJara hatkeजरा हटके