शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
2
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
5
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
6
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
7
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
8
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
9
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
10
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
11
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
12
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
13
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
14
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
15
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
16
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
17
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
18
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
19
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
20
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?

हेल्मेट नसल्यास लायसन सस्पेंड होणार, 1000 चा दंड; कर्नाटकमध्ये केंद्राचा नियम लागू

By हेमंत बावकर | Updated: October 20, 2020 16:17 IST

New Helmet rule in Karnataka: देशात सर्वाधिक अपघाती मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होतात. दुचाकींच्या अपघाताची संख्याही जास्त आहे. यामुळे कर्नाटक वाहतूक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, चार वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांनाही हल्मेट सक्तीचे केले जाणार आहे.

वाहतुकीच्या नियमांमध्ये काही दिवसांपूर्वी महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. मात्र, तरीही देशात वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली जाते. तसेच वाहतूक पोलिसांनाही चकविणे हिरोगिरी मानली जाते. दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसेल तर तो गुन्हा आहे. अशातच कर्नाटक सरकारने मोठा आदेश जारी केला आहे. बिना हेल्मेट दुचाकी चालविताना आढळल्यास दुचाकीस्वारचे लायसन सस्पेंड केले जाणार आहे. 

देशात सर्वाधिक अपघाती मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होतात. दुचाकींच्या अपघाताची संख्याही जास्त आहे. यामुळे कर्नाटक वाहतूक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, चार वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांनाही हल्मेट सक्तीचे केले जाणार आहे. जर विनाहेल्मेट पकडण्य़ात आले तर तीन महिन्यांसाठी लायसन निलंबित करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर दंडही भरावा लागणार आहे.

केंद्र सरकारच्या मोटर व्हेईकल अॅक्टच्या सेक्शन 129 नुसार दुचाकी चालविणाऱ्यांसाठी BS स्टँडर्डचे हॅल्मेट घालणे आवश्यक आहे. जर कोणी नियम तोडत असेल तर त्याचे लायसन तीन महिन्यांसाठी सस्पेंड करावे. तसेच 1000 रुपयांचा दंडही आकारण्यात यावा.  

केंद्र सरकारने गेल्या वर्षी हे नवे नियम लागू केले होते. मात्र, कर्नाटक सरकारने ही दंडाची रक्कम घटवून 500 रुपये केली होती. तसेच लायसन सस्पेंड करण्याचा आदेश लागू केला नव्हता. आता दंडाची रक्कम वाढवून लायसन निलंबित करण्याचा आदेशही लागू केला आहे. कर्नाटकमध्ये 1.65 कोटी अधिकृत दुचाकी आहेत. एकट्या बेंगळुरूमध्ये 59.9 लाख दुचाकी आहेत. 

...तर उद्यापासून वाहन चालकांच्या अडचणी वाढणार

कोणत्याही वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) नसल्यास त्याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यास आतापर्यंत बंदी होती. पण १५ ऑक्टोबरला परिवहन आयुक्तांनी आदेश जारी करत विना एचएसआरपी वाहनांना आरटीओ (RTO) मध्ये होणाऱ्या काही कामांसाठी मनाई असेल, असे आदेश दिले.  एचएसआरपी एक होलोग्राम स्टिकर असतो. त्यावर वाहनाचं इंजिन आणि चेसीस नंबर असतो. सुरक्षा आणि सुविधा विचारात घेऊन एचएसआरपी तयार करण्यात आली. हा नंबर मशीननं लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पिन असते, ती वाहनाला जोडलेली असते. 

१९ ऑक्टोबरपासून कोणत्या कामांवर बंदी?- विना एचएसआरपी वाहनाच्या सर्टिफिकेटची सेकंड कॉपी- वाहनाचं रजिस्ट्रेशन ट्रान्सफर- पत्त्यात बदल- रजिस्ट्रेशनचं नुतनीकरण- ना हरकत प्रमाणपत्र- आरटीओ हायपॉथिकेशन कॅन्सलेशन- हायपऑथिकेशन एन्डॉर्समेंट- नवीन परवाना- तात्पुरता परवाना- विशेष परवाना- राष्ट्रीय परवाना

असा करता येईल ऑनलाईन अर्जहाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोड स्टिकर लावण्याची प्रक्रिया आता सहजसोपी झाली आहे. एचएसआरपी लावण्यासाठी दोन संकेतस्थळं तयार करण्यात आली आहेत. यासाठी bookmyhsrp.com/index.aspxसंकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर सार्वजनिक किंवा खासगी वाहनाशी जोडलेला एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर काही माहिती द्यावी लागेल. गाडीला रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास www.bookmyhsrp.com या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरावी लागेल.

टॅग्स :two wheelerटू व्हीलरtraffic policeवाहतूक पोलीसKarnatakकर्नाटकRto officeआरटीओ ऑफीस