शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

ग्लोबल एनकॅपकडे एकही कार पाठवणार नाही; सुरक्षा चाचण्यांपासून मारुतीनं काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 8:24 AM

ग्लोबल एनकॅपचे सीईओ डेव्हिड वार्ड यांनी भारतातील कंपन्यांनी टाटा आणि महिंद्राचा आदर्श घ्यावा आणि सुरक्षित कार बनवाव्यात असा सल्ला दिला.

ठळक मुद्देमारुतीच्या ताफ्यात डझनावर कार आहेत. मात्र, त्यांची केवळ एकच कार चार स्टार रेटिंग मिळविलेली आहे. भारतात रस्त्यांवर पाहिल्यास 10 पैकी 7 कार या मारुतीच्याच दिसतात.

मुंबई : टाटाच्या दोन कारनी सुरक्षा मानांकन देणाऱ्या ग्लोबल एनकॅपचे पाच स्टार मिळविले आहेत. यापैकी दुसरी कार अल्ट्रूझच्या लाँचिंगवेळी एनकॅपचे सीईओ डेव्हिड वार्ड यांनी थेट मारुतीच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच मारुतीने दर्जेदार सुरक्षा पुरविणाऱ्या कार बनवून दाखवाव्यात असे आव्हानही दिले होते. यावर मारुतीने हे आव्हान स्वीकारण्याऐवजी पळपुटेपणा दाखविला आहे. 

मारुतीच्या ताफ्यात डझनावर कार आहेत. मात्र, त्यांची केवळ एकच कार चार स्टार रेटिंग मिळविलेली आहे. भारतात रस्त्यांवर पाहिल्यास 10 पैकी 7 कार या मारुतीच्याच दिसतात. भारतात रस्ते अपघातांची संख्याही कमालीची वाढल्याचे खुद्द रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही म्हटले होते. यामुळे मारुतीने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पाऊले उचलणे गरजेचे होते. 

वॉर्ड यांनी भारतातील कंपन्यांनी टाटा आणि महिंद्राचा आदर्श घ्यावा आणि सुरक्षित कार बनवाव्यात असा सल्ला दिला. तसेच मारुतीसाठी हे चॅलेंज असेल, असेही ते म्हणाले. एकीकडे मारुतीला फटकारताना त्यांनी फोक्सवॅगन आणि टोयोटालाही कानपिचक्या दिल्या. या जागतिक दर्जाच्या कार कंपन्यांकडे फाईव्ह स्टार सुरक्षेच्या कार भारतीय बाजारात नसाव्यात याबद्दल खेद व्यक्त केला होता. 

यावर मारुतीने प्रतिक्रिया दिली आहे. मारूती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक सी व्ही रामन यांनी सांगितले की, मारुती सुझुकी नुकतेच गरजेचे केलेले साईड इम्पॅक्ट आणि पादचारी सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. जे नियम सरकारने बनविलेले आहेत ते पाळण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, मारुती सुझुकी अन्य कोणत्याही एजन्सीला कार पाठविणार नाही. मारुती सुझुकी केवळ भारत सरकारच्या नियमांमध्ये राहुनच काम करेल.  ग्लोबल एनकॅपची क्रॅश टेस्ट पास करणे भारतीय कायद्यामध्ये नाही. मात्र, एनकॅप स्वत: कार खरेदी करून त्या कारची चाचणी घेऊ शकते. याचा बऱ्याच उत्पादकांना फायदा मिळाला आहे. टाटा, महिंद्रासारख्या कंपन्या स्वत:हून त्यांच्या काही कार तिकडे पाठवत असतात. 

भारताकडेही क्रॅश टेस्टची यंत्रणा...पणभारतामध्ये स्वत:ची सुरक्षा चाचणी घेण्याची यंत्रणा आहे. याचे नाव भारत न्यू व्हेईकल सेफ्टी असेसमेंट प्रोग्राम (BNVSAP) असे आहे. भारत सरकारच या चाचण्या घेते. या चाचण्या Global NCAP सारख्याच असतात. यानंतरच या कार विक्रीसाठी बाजारात येतात. मात्र, या दोन्ही एजन्सीच्या चाचण्यांमध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे वेगाचा. ग्लोबल एनकॅपमध्ये सरासरी वेग 64 किमी तर BNVSAP हा वेग 56 किमी ठेवलेला असतो. 

Video: पेट्रोल पंपावर कारचा दरवाजा कधीच उघडू नका; वाचा कारण

डिझेलप्रेमींना मारुतीचा दे धक्का; कार विक्रीच केली कायमची बंद

ग्रेट वॉल मोटर्सची भारतात एन्ट्री; तळेगावच्या जनरल मोटर्स कंपनीचा घेणार ताबा

 

 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटाMahindraमहिंद्राToyotaटोयोटा