Video: Never open a car door at a petrol pump; Read scientific reason | Video: पेट्रोल पंपावर कारचा दरवाजा कधीच उघडू नका; वाचा कारण

Video: पेट्रोल पंपावर कारचा दरवाजा कधीच उघडू नका; वाचा कारण

ठळक मुद्देपेट्रोल पंपावर आग लागण्याच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत.तुम्ही कधी स्थिर विद्युतभार नावाचा प्रकार ऐकला असेल.

पेट्रोल पंपावर आग लागण्याच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. कधी मोबाईलवर बोलताना तर कधी सिगारेट ओढत असताना आग लागल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, अनेकदा कारचा दरवाजा उघडल्यानंतर पेट घेतल्याचेही प्रकार घडले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 


एका पेट्रोल पंपावर मोबाईल, सिगारेट, लायटर असे काहीही कारण नसतानाही कारला आग लागली आहे. कार चालकाने दरवाजा उघडताच काही क्षणांत आगीचा भडका उडाला आहे. ऐकायला थोडे अजब वाटेल पण कार चालकाने दरवाजा उघडल्यानेच आग लागली आहे. 


तुम्ही कधी स्थिर विद्युतभार नावाचा प्रकार ऐकला असेल. पेट्रोल पंपावर येताना कार, टायर हे हवा आणि जमिनीला घासत असतात. यामुळे कारमध्ये एकप्रकारचा विद्युतप्रवाह निर्माण झालेला असतो. जेव्हा तुम्ही कारमध्ये असता तेव्हा हा विद्युतप्रवाह जमिनीला जात नाही. परंतू जेव्हा तुम्ही दरवाजा उघडता आणि जमिनीवर पाय ठेवता तेव्हा हा विद्युतप्रवाह वाहू लागतो. 


स्थिर भार म्हणजे धन आणि ऋण प्रभारामधील असमानता असते. जेव्हा हा भार एखाद्या वस्तूच्या संपर्कात येतो तेव्हा तो प्रवाहित होतो. या डिस्चार्ज होण्यामुळे स्पार्क होते आणि आग लागते. हा प्रकार तुम्ही हिवाळ्यात रजई अंगावर ओढलेली असताना किंवा प्लॅस्टिकच्या खुर्चीमध्ये बसलेले असताना हात लावताच फाट असा आवाज आलेला अनुभवू शकता. नेमका हाच प्रकार या पेट्रोल पंपावर घडला आहे. आणि तो कुठेही घडू शकतो. 

डिझेलप्रेमींना मारुतीचा दे धक्का; कार विक्रीच केली कायमची बंद


पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ आहे. या चालकाने पेट्रोल भरत असताना कारचा दरवाजा उघडून बाहेर पाय ठेवले आणि कर्मचाऱ्याशी बोलू लागला. यामुळे जमिनीशी स्थिर भाराचा स्पर्श झाल्याने काही क्षणांतच स्पार्क झाले आणि भडका उडाला. 

Web Title: Video: Never open a car door at a petrol pump; Read scientific reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.