महिलांसाठी योग्य कार कोणती? कधी केलाय का विचार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 10:51 AM2018-10-23T10:51:08+5:302018-10-23T10:54:12+5:30

रोजच्या लाईफमध्ये आपण पुरुषांनाच प्राधान्य देतो. गाडीची गरज महिलांनाही असते. मात्र त्यांच्या गरजाही वेगळ्या असतात. यामुळे सर्वच गाड्या महिलांच्या वापरासाठी योग्य असतीलच असे नाही.

Which car is useful for women? The idea of ​​ever-doing ... | महिलांसाठी योग्य कार कोणती? कधी केलाय का विचार...

महिलांसाठी योग्य कार कोणती? कधी केलाय का विचार...

googlenewsNext

रोजच्या लाईफमध्ये आपण पुरुषांनाच प्राधान्य देतो. गाडीची गरज महिलांनाही असते. मात्र त्यांच्या गरजाही वेगळ्या असतात. यामुळे सर्वच गाड्या महिलांच्या वापरासाठी योग्य असतीलच असे नाही. यामुळे आज केवळ महिलांना चालविण्यासाठी योग्य असलेल्या कार पाहूया...


कार घ्यायची झाली की गाडीची सुरक्षा फिचर्स महत्वाचे आहेत. एबीएस, एअरबॅग हवीच. दुसरे म्हणजे स्मूथनेस. स्टिअरिंग लाईट, क्लच आणि गिअर लाईट असतील तर महिलांना या कार चालविण्यास सोप्या असतात. आणखी एक पाहण्याची बाब म्हणजे व्हिजिबिलीटी. कारण रस्त्यावर चालविताना चारही बाजुंच्या गोष्टी-वाहने दिसणे महत्वाचे असते. महत्वाची गोष्ट म्हणजे अॅटोमॅटीक गिअर बॉक्स, कारण ट्रॅफिकही खूप असते आणि बऱ्याचदा महिलांसोबत छोटे मूलही असते. यामुळे सर्वच गोष्टींवर लक्ष ठेवणे सोपे नसल्याने चालविताना जेवढी कार सोपी असेल तेवढे चांगले असते. 


सर्वात महत्वाचे म्हणजे कार जेवढी छोटी असेल तेवढी चालविण्यास, वळविण्यास चांगली असते. यामुळे ह्युंदाईची ग्रँड आय 10 चांगली आहे. एबीएस, इबीडी स्टँडर्ड; स्टिअरिंग एकदम स्मूथ आहे. मॅन्युअलसोबत अॅटोमॅटीक गिअरबॉक्सही मिळतो. किंमत 4.4 लाखांपासून सुरु होते. 


सुझुकी इग्निस ही कारही छोटी कार असल्याने चालविण्यास सोपी आहे. सीट उंचीवर आहेत. यामुळे व्हीजिबिलीटी चांगली आहे. मारुतीचे सर्व्हिस नेटवर्कही चांगले आहे. एबीएस, इबीडी स्टँडर्ड आहे. केवळ स्टेअरिंग वळविल्यानंतर पुन्हा मूळ जागी येण्याची प्रक्रिया थोडी हळू आहे. मायलेजही चांगले आहे. 


टाटा टिआगो ही कारही चांगली आणि सुरक्षित आहे. या कारमध्ये अॅटोमॅटीक व्हेरिअंटही उपलब्ध आहे. मात्र, एबीएस, इबीडी हे केवळ एक्सझेड व्हेरिअंटमध्येच उपलब्ध आहेत. यामुळे हेच व्हेरिअंट घ्यावे. मायलेजही पेट्रोलला 22-23 पर्यंत मिळते. डिझेलसाठी ही कार घेऊ नये. कारण तीन सिलिंडरचे इंजिन असल्याने आवाज जास्त येतो. जो त्रासदायक आहे.


सेलेरिओ ही मारुतीची आणखी एक छोटी कार सेलेरिओ आता एअरबॅग आणि एबीएसने युक्त आहे. सर्व्हिस नेटवर्क चांगले. सीएनजीमध्येही उपलब्ध. मायलेजही चांगले आहे. व्हिजीबिलिटीही चांगली आहे. 


फोर्डची फ्रीस्टाईलही चांगली कार आहे. मात्र, अद्याप या कारमध्ये अॅटोमॅटीक व्हेरिअंट दिलेले नाही. सुरक्षेच्या बाबतीत ही कार वरील सर्व कारना मात देते. दणकट बांधणी आणि खड्ड्यांमधून आतमध्ये बसलेल्या व्यक्तींना धक्का न लावता कार चालते. व्हिजिबिलीटी देखील चांगली आहे. 

 

(टीप : येथे कोणताही भेदाभेद करण्याचा हेतू नाही.)
 

Web Title: Which car is useful for women? The idea of ​​ever-doing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.