शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Car Driving Tips: धावत्या कारचे ब्रेक फेल झाले, तर लक्षात ठेवा या ५ गोष्टी, टळेल अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 12:45 IST

Car Driving Tips: कार चालवताना कारमध्ये अनेकदा असे काही दोष निर्माण होतात ज्याबाबत आपण कधी विचारही केलेला नसतो. (what will do when Car Brakes Fail) कारचे ब्रेक फेल झाल्यास त्या परिस्थितीत काय करायचं याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

कार चालवताना कारमध्ये अनेकदा असे काही दोष निर्माण होतात ज्याबाबत आपण कधी विचारही केलेला नसतो. या दोषांमुळे अनेकदा दुर्घटनाही होतात. कार बाळगणारे बहुतांश लोक कारच्या मेन्टेनन्सवर पूर्ण लक्ष देतात. तसेच त्यामध्ये काही दोष निर्माण झाल्यास तो दुरुस्त करतात. मात्र तरीही यातील एखादा पार्ट कधी नादुरुस्त होऊन काम करणं बंद करेल हे सांगता येत नाही. त्यातून एखादा मोठा अपघात होऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला कारमधील ब्रेक फेल झाल्यास त्या परिस्थितीत पुढील दुर्घटना टाळण्यासाठी काय करायचं, याची माहिती देणार आहोत. अशा परिस्थिती थोड्याशा प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टाळता येईल. कारचे ब्रेक फेल झाल्यास त्या परिस्थितीत काय करायचं याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

कारचे ब्रेक फेल झाल्यास काय करायचं- कारचे ब्रेक फेल झाल्यास एक्सलेटरवरून त्वरित पाय हटवा- कार लवकरात लवकर खालच्या गिअरवर आणा. त्यामुळे कारचा वेग कमी होईल.- यादरम्यान ट्रॅफिकमधून हटवून कार बाजूला घ्या. त्यानंतर ती रस्त्यावर घ्या.- गिअर बदलून पहिल्या गिअरपर्यंत आणा. कारण पहिल्या गिअरमध्ये कारचा वेग सर्वात कमी असतो.- त्यानंतर हँडब्रेक हळूहळू एंगेज करा. हँडब्रेक एका झटक्यात खेचू नका. कारण त्यामुळे कार घसरू शकते. बहुतांश गाड्यांमध्ये वायरशी अॅटॅच असल्याने कारचे ब्रेक फेल झाल्यासच त्याचा वापर करा.- सर्व प्रयत्नांनंतर कार थांबली की ती पुन्हा चालू करून चालवण्याचा प्रयत्न करू नका. ती टो करून जवळच्या सर्व्हिस स्टेशनमध्ये न्या. 

टॅग्स :carकारAutomobileवाहन