Car Driving Tips: धावत्या कारचे ब्रेक फेल झाले, तर लक्षात ठेवा या ५ गोष्टी, टळेल अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:38 PM2023-08-31T12:38:54+5:302023-08-31T12:45:58+5:30

Car Driving Tips: कार चालवताना कारमध्ये अनेकदा असे काही दोष निर्माण होतात ज्याबाबत आपण कधी विचारही केलेला नसतो. (what will do when Car Brakes Fail) कारचे ब्रेक फेल झाल्यास त्या परिस्थितीत काय करायचं याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

what will do when Car Brakes Fail: If the brakes of a running car fail, remember these 5 things to avoid an accident | Car Driving Tips: धावत्या कारचे ब्रेक फेल झाले, तर लक्षात ठेवा या ५ गोष्टी, टळेल अपघात

Car Driving Tips: धावत्या कारचे ब्रेक फेल झाले, तर लक्षात ठेवा या ५ गोष्टी, टळेल अपघात

googlenewsNext

कार चालवताना कारमध्ये अनेकदा असे काही दोष निर्माण होतात ज्याबाबत आपण कधी विचारही केलेला नसतो. या दोषांमुळे अनेकदा दुर्घटनाही होतात. कार बाळगणारे बहुतांश लोक कारच्या मेन्टेनन्सवर पूर्ण लक्ष देतात. तसेच त्यामध्ये काही दोष निर्माण झाल्यास तो दुरुस्त करतात. मात्र तरीही यातील एखादा पार्ट कधी नादुरुस्त होऊन काम करणं बंद करेल हे सांगता येत नाही. त्यातून एखादा मोठा अपघात होऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला कारमधील ब्रेक फेल झाल्यास त्या परिस्थितीत पुढील दुर्घटना टाळण्यासाठी काय करायचं, याची माहिती देणार आहोत. अशा परिस्थिती थोड्याशा प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टाळता येईल. कारचे ब्रेक फेल झाल्यास त्या परिस्थितीत काय करायचं याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

कारचे ब्रेक फेल झाल्यास काय करायचं
- कारचे ब्रेक फेल झाल्यास एक्सलेटरवरून त्वरित पाय हटवा
- कार लवकरात लवकर खालच्या गिअरवर आणा. त्यामुळे कारचा वेग कमी होईल.
- यादरम्यान ट्रॅफिकमधून हटवून कार बाजूला घ्या. त्यानंतर ती रस्त्यावर घ्या.
- गिअर बदलून पहिल्या गिअरपर्यंत आणा. कारण पहिल्या गिअरमध्ये कारचा वेग सर्वात कमी असतो.
- त्यानंतर हँडब्रेक हळूहळू एंगेज करा. हँडब्रेक एका झटक्यात खेचू नका. कारण त्यामुळे कार घसरू शकते. बहुतांश गाड्यांमध्ये वायरशी अॅटॅच असल्याने कारचे ब्रेक फेल झाल्यासच त्याचा वापर करा.
- सर्व प्रयत्नांनंतर कार थांबली की ती पुन्हा चालू करून चालवण्याचा प्रयत्न करू नका. ती टो करून जवळच्या सर्व्हिस स्टेशनमध्ये न्या. 

Web Title: what will do when Car Brakes Fail: If the brakes of a running car fail, remember these 5 things to avoid an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.