शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थोडं थांबा! एक, दोन नाही...Royal Enfield च्या चार बुलेट येतायत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 09:58 IST

Royal Enfield bullet : बुलेटला जो मान आहे अन्य कोणत्याही दुचाकीला नाही. मोठमोठ्या कंपन्यांनी प्रयत्न करून पाहिले परंतू बुलेट ती बुलेट. एक लाखापासून ते दोन-अडीज लाखांपर्यंत या धाकड बाईक मिळतात.

Royal Enfield ने भारतात जबरदस्त पाय रोवले आहेत. बुलेटला जो मान आहे अन्य कोणत्याही दुचाकीला नाही. मोठमोठ्या कंपन्यांनी प्रयत्न करून पाहिले परंतू बुलेट ती बुलेट. एक लाखापासून ते दोन-अडीज लाखांपर्यंत या धाकड बाईक मिळतात. परंतू त्यांची तरुण तुर्क ते म्हातारे खोतारे यांच्यामध्ये असलेली क्रेझ एवढी भन्नाट आहे की कंपनीलाही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण जाते. आता या धाकड बाईकचा वेटिंगही वर्षवर्षभर करावा लागतो. 

जर नवीन बुलेट घ्यायची असेल तर थोडा वेळ थांबावे लागणार आहे. रॉयल एन्फील्ड भारतीय बाजारात नवीन मॉडेल लवकरच लाँच करणार आहे. 

रॉयल एन्फील्ड हंटर रॉयल एन्फील्ड हंटर ही बाईक क्लासिक 350 सीसी इंजिनची असणार आहे. क्लासिक 350 ला मोठी पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच लीक झालेल्या डॉक्युमेंटमध्ये रॉयल एन्फील्ड हंटर हे नाव समोर आले होते. ही बाईक नवीन जे प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. 

रॉयल एन्फील्ड क्लासिक 350ही बाईक खूपच गाजलेली आहे. या बाईकचे नवीन मॉडेल दुसऱ्या तिमाहीमध्ये लाँच केले जाणार आहे. ही बाईकदेखील नवीन जे प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीद्वारे वळण घेताना बाईक आधीपेक्षा जास्त स्टेबल असणार आहे. 

रॉयल एन्फील्ड इंटरसेप्टररॉयल एनफील्डची ही बाईक 650cc इंजिनची आहे. आता ही बाईक 350 सीसीच्या इंजिनमध्येही येणार आहे. या बाईकला इंटरसेप्टर 350 चे नाव दिले जाऊ शकते. ही बाईक सिंगल एग्सॉस्ट सिस्टमसोबत लाँच केली जाणार आहे. 

रॉयल एन्फील्ड क्रूझर 650 ही कंपनीची 650cc च्या इंजिनची बाईक आहे. ही बाईक रॉयल एन्फील्डच्या Interceptor 650 आणि Continental GT 650 चा पोर्टफोलिओमध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईक