शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जरा थांबा! टाटा पंच ईव्ही नेक्सॉनपेक्षा जास्त रेंज देणार? कंपनीच्या डायरेक्टरनीच केली 'लीक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 13:02 IST

टाटाकडे सध्या तीन ईलेक्ट्रीक कार आहेत. यापैकी दोन फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत. यात आणखी दोन फाईव्ह स्टार वाल्या कार वाढणार आहेत.

गेल्या काही वर्षांत रस्त्यावरील टाटाची उपस्थिती लक्षणियरित्या वाढली आहे. सगळीकडे टाटाच्या कार दिसू लागल्या आहेत. कधी काळी टाटाने कार बनवू नये, ट्रकच बनवावेत असे सांगितले जायचे. परंतू, आता टाटाच टाटा ते पण फाईव्ह स्टार असे समीकरण झाले आहे. यात ईलेक्ट्रीक कारची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना टाटा आणखी तीन कार ईलेक्ट्रीकमध्ये आणत आहे. खप वाढल्याने टाटाने ईव्ही कारचा बिझनेस इंधनावरील कारच्या बिझनेसपासून वेगळा करण्याचा निर्णय़ घेतला आहे. टाटाकडे सध्या तीन ईलेक्ट्रीक कार आहेत. यापैकी दोन फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत. यात आणखी दोन फाईव्ह स्टार वाल्या कार वाढणार आहेत. सुरक्षेविषयी जागरुक झालेले लोक आता टाटाच्या कार घेत आहेत. कमी बजेटमध्ये टाटा टियागो, टिगॉर ईव्ही आणि जास्त बजेटमध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही उपलब्ध आहे. परंतू. आता मधल्या सेगमेंटमध्ये टाटा नेक्स़ॉनपेक्षाही जास्त रेंज असलेली कार आणण्याच्या तयारीत आहे. टाटा पंच लवकरच ईव्हीमध्ये देखील येत आहे. टाटा नेक्सॉनची मॅक्सची रेंज ४६५ किमी असताना पंच ५०० किमीपेक्षा जास्तीची रेंज देणार असल्याचे संकेत टाटाच्याच बड्या अधिकाऱ्यांनी केले आहे. टाटाचे मॅनेजिंग डायरेक्टर शैलेश चंद्रा यांनी एका मुलाखतीत टाटा पंच, हॅरिअर आणि कर्व्ह ईव्हीची रेंज सांगितली आहे. ईव्हीच्या बॅटरींची किंमत कमी होत आहे. यामुळे याचा फायदा आम्ही कारची रेंज वाढविण्यासाठी करत आहोत. येत्या काळात पंच ईव्ही, हॅरिअर आणि कर्व्ह ईव्हीच्या रेंज ५०० प्लस असतील. यामुळे ग्राहकांना रेंजची चिंता करत राहण्याचे कारण उरणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. टाटा पंच ही टियागो आणि नेक्सॉन ईव्हीच्या मधील रेंजची जागा घेईल असे सांगितले जात होते. परंतू, चंद्रा यांच्या वक्तव्यानंतर पारडेच पालटले आहे. पंच ईव्ही ५०० किमीपेक्षा जास्तीची रेंज देऊ लागली तर नेक्सॉन मागे पडण्याची शक्यता आहे. सध्या नेक्स़ॉन ३५० ते ४६५ किमी पर्यंतची रेंज देते. त्यापेक्षा ४० ते ५० किमी जास्तीची रेंज पंच देण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Tataटाटाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर