शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

फॉक्सवॅगनच्या गाड्यांना आग लागू शकते, कंपनीने 1 लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:23 IST

Volkswagen : फॉक्सवॅगनची सब्सिडियरी ब्रँड ऑडीच्या जवळपास 24,400 गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. स्कोडा आणि सीट वाहनेही या रिकॉलच्या कक्षेत आली आहेत.

नवी दिल्ली : फॉक्सवॅगन ग्रुपने  (Volkswagen Group) जगभरात विकल्या गेलेल्या 1 लाखाहून अधिक प्लग-इन हायब्रिड गाड्या परत मागवल्या आहेत. कारण या सर्व गाड्यांना आग लागण्याचा धोका होता. कंपनीने सांगितले की, फॉक्सवॅगन पसाट, गोल्फ, टिगुन आणि आर्टिओनच्या सुमारे 42,300 ग्राहकांशी संपर्क साधला जात आहे, याशिवाय फॉक्सवॅगनची सब्सिडियरी ब्रँड ऑडीच्या जवळपास 24,400 गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. स्कोडा आणि सीट वाहनेही या रिकॉलच्या कक्षेत आली आहेत.

फॉक्सवॅगनच्या म्हणण्यानुसार,  इंटरनल कंबन्शन इंजिनला इलेक्ट्रिक ड्राइव्हशी जोडणाऱ्या तंत्रज्ञानातील त्रुटीमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते. 1 लाख वाहने परत मागवल्याबद्दल, फॉक्सवॅगनच्या प्रवक्त्याने सांगितले की, "इंधनावर चालणारे इंजिन आणि इलेक्ट्रिक ड्राइव्हला जोडणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये काही समस्या आहेत. यामुळे, इन्सुलेटेड हाय व्होल्टेज बॅटरी कारमध्ये शॉर्ट सर्किट करू शकते, ज्यामुळे कारला आग लागण्याचा धोका निर्माण होतो.

जर्मनीमध्ये अशाप्रकारची 16 प्रकरणे समोर जर्मनीचे एक वृत्तपत्र रेग्युलेटर केबीएच्या आधारावर फॉक्सवॅगनच्या प्रवक्त्याने सांगितले की, "इंजिन डिझाइन कव्हर योग्यरित्या पॅक केलेले नसू शकते, ज्यामुळे गरम हवेच्या संपर्कात आल्यावर कारला आग लागू शकते," या वृत्तपत्रात असेही म्हटले आहे की, जर्मनीमध्ये अशी 16 प्रकरणे समोर आली आहेत.रिकॉलमुळे फॉक्सवॅगन ग्रुपच्या गाड्यांव्यतिरिक्त ऑडी, सीट आणि स्कोडा या गाड्यांवरही परिणाम होईल.

फॉक्सवॅगन वर्टसची बुकिंग सुरुभारतीय बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने गेल्या काही वर्षांत भारतात सातत्याने आपली अनेक नवीन वाहने लॉन्च केली आहेत. कंपनीची आगामी कार फॉक्सवॅगन वर्टस आहे, ज्याची प्री-बुकिंग भारतात सुरू झाली आहे. ज्यांना कार खरेदी करण्याची इच्छा आहे, ते 11,000 रुपयांच्या टोकन रकमेसह सेडान बुक करू शकतात. कंपनीने भारतात या कारचे उत्पादनही सुरू केले आहे.

टॅग्स :Volkswagonफोक्सवॅगनAutomobileवाहन