शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर जोरात: देशातील वाहन विक्रीत झाली 10 टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 05:16 IST

Auto Sector : देशातील वाहन उद्योगामध्ये सन २०२१मध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबतचा एक अहवाल नोमुरा रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रकाशित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ग्राहकांकडून येत असलेली वाढती मागणी आणि अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याने डिसेंबर महिन्यामध्ये देशातील वाहनांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांच्या विक्रीमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशामधील छोट्या कारच्या विक्रीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये वाढ झाली आहे. सर्वात मोठी उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या विक्रीमध्ये १७.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

या कंपनीच्या अल्टो आणि एसप्रेसो या छोट्या कारची मागणी ४.४ टक्क्यांनी वाढलेली दिसून आली. ह्युंदाई मोटर्सची विक्रीही डिसेंबर महिन्यामध्ये चांगली राहिली. या कंपनीच्या विक्रीमध्ये २४.८९ टक्के वाढ झाल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. याशिवाय महिंद्र ॲण्ड महिंद्र आणि होंडा कार्स या कंपन्यांनीही गतमहिन्यामध्ये आपल्या कारची विक्री वाढल्याचे जाहीर केले आहे.

महिंद्रच्या गाड्यांची मागणी ३ टक्क्यांनी वाढल्याचे कंपनीने  जाहीर केले.  मात्र कंपनीची एकूण विक्री मात्र या महिन्यामध्ये कमी झालेली दिसून येत आहे. टोयोटा किर्लोस्करची विक्री डिसेंबर महिन्यामध्ये १४ टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात या कंपनीच्या ६५४४ वाहनांची विक्री झाली होती. त्यामध्ये यंदा वाढ होऊन ती ७४८७ झाली आहे. होंडा कार्सची देशांतर्गत विक्री २.६८ टक्क्यांनी वाढली आहे. तर एमजी मोटर इंडियाची विक्री ३३ टक्क्यांनी वाढल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. 

चालू वर्षामध्ये मोठ्या वाढीची अपेक्षादेशातील वाहन उद्योगामध्ये सन २०२१मध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबतचा एक अहवाल नोमुरा रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रकाशित केला आहे. त्यामध्ये वरील आशावाद व्यक्त करण्यात आला असून देशामध्ये इलोक्ट्रीक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यताही वर्तविली गेली आहे. कोरोनाचा वाहन उद्योगाला मागील वर्षामध्ये मोठा फटका बसला तरी आगामी वर्षात या उद्योगाचे भवितव्य चांगले दिसते. देशामधील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढून त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याची अपेक्षाही या अहवालात वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग