शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Brezza ची हवा टाइट करायला येतेय Tata ची नवी SUV! असेल अधिक पॉवरफूल आणि फीचर लोडेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:15 IST

अद्ययावत नेक्सॉन मॉडेलचे डिझाईन आणि स्टाईल टाटा कर्व्ह एसयूव्ही कूप कन्सेप्ट प्रमाणे असेल. जी आपण सर्वांनी 2023 ऑटो एक्सपोमध्ये बघितली होती.

मारुती ब्रेझा आणि टाटा नेक्सॉन यांच्यात सब-4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये जबरदस्त स्पर्धा असते. मात्र आता नवी अपडेटेड नेक्सॉन लॉन्च होत आहे. ही कार अधिक पॉवरफुल आणि अधिक फीचर लोडेड असेल. खरे तर, अपडेटेड टाटा नेक्सॉनच्या लॉन्च डेट संदर्भात अद्याप घोषणा झालेली नाही. पण, कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे हे नवे मॉडेल ऑगस्ट 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. तसेच जुलैपर्यंत ही सीरीज प्रोडक्शनमध्येही एंटर करू शकते.

अद्ययावत नेक्सॉन मॉडेलचे डिझाईन आणि स्टाईल टाटा कर्व्ह एसयूव्ही कूप कन्सेप्ट प्रमाणे असेल. जी आपण सर्वांनी 2023 ऑटो एक्सपोमध्ये बघितली होती. या कारमध्ये अधिकांश बदल फ्रंटला केले जातील. यात डायमंड शेप्ड इंसर्ट्ससह नव्या डिझाईनची ग्रील असेल. तसेच हिचे हेडलॅम्प्स काही प्रमाणात खालच्या बाजुला असती. या कारमध्ये सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक अपराईट स्टान्स मिळतील. SUV मध्ये अलॉय व्हील्सचा नवा सेट मिळू शकतो. रिअर सेक्शनमध्येही काही प्रमाणावर बदल करण्यात येईल. टेलगेटवर एलईडी लाइट बार मिळेल, जे टेललॅम्प्सना जोडेल.

Tata Nexon 2023 फेसलिफ्टमध्ये नवे 10.25-इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम मिळण्याचीही शक्यता आहे. जे आपल्याला अपडेटेड हॅरिअर आणि सफारीमध्येही दुसून आले. तसेच इतर काही महत्वाच्या अपडेटमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, मोठे सनरूफ, 360 डिग्री कॅमरा आणि कूल्ड सीट्सचा समावेश असू शकतो. 

या शिवाय, या सबकॉम्पॅक्ट SUV ला अ‍ॅडव्हॉन्स्ड ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (ADAS) सूटही दिला जाऊ शकतो, असा कयासही लावला जात आहे. जर असे झालेच, तर नवी नेक्सॉन ADAS तत्रज्ञानासह येणारी ही सेगमेन्टमधील पहिलीच कार असेल. तसेच, टाटा नेक्सन फेसलिफ्टला नवे 1.2L टर्बो पेट्रोल इंजिनसह आणले जाऊ शकते. जे 125bhp पॉवर आणि 225Nm टार्क जनरेट करू शकते. 1.5L डिझेल इंजिनही ऑफर केले जाऊ शकते. 

 

टॅग्स :AutomobileवाहनTataटाटाMarutiमारुतीcarकार