शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Maruti Fronx पासून नवीन महिंद्रा थारपर्यंत, एप्रिलमध्ये 'या' कार लाँच होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 13:15 IST

Maruti Fronx, MG Comet EV, Citroen च्या नवीन एसयूव्ही आणि नवीन Mahindra Thar लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहेत. 

नवी दिल्ली : एप्रिल महिन्यात भारतीय कार बाजारात काही शानदार कार लाँच होणार आहेत. या आगामी कारच्या यादीत महिंद्रा, मारुती सुझुकी, एमजी आणि सिट्रॉएन या मॉडेल्सचा समावेश असणार आहे. त्यामुळे तुमचा नवीन कार घेण्याचा विचार करत असेल तर या महिन्यानंतर तुमच्याकडे कार निवडण्यासाठी आणखी पर्याय असतील. Maruti Fronx, MG Comet EV, Citroen च्या नवीन एसयूव्ही आणि नवीन  Mahindra Thar लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहेत. 

Maruti Suzuki Fronxयावर्षी ऑटो एक्सपोमध्ये मारुती फ्रँक्स सादर करण्यात आली होती. आता ही कार डीलरशिपपर्यंत पोहोचली आहे. कंपनी लवकरच कारच्या किमती जाहीर करणार आहे. या कारचे एकूण 5 व्हेरियंटमध्ये लाँच केले जाऊ शकते. Fronx SUV दोन इंजिन पर्यायांसह सादर केली जाईल. यापैकी एक 1.0-लिटर 3- सिलिंडर टर्बो पेट्रोल बूस्टरजेट इंजिन असणार आहे. हे इंजिन 100hp पॉवर जनरेट करेल. दुसरे 1.2 लीटर 4-सिलिंडर नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिन असणार आहे. हे 90hp पॉवर आणि 113Nm पीक टॉर्क जनरेट करेल. टर्बो इंजिनला 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जाईल. नॅचरली एस्पिरेटेड इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळणार आहे.

MG Comet EVही एमजी इलेक्ट्रिक कार Wuling Air EV सारखी असणार आहे, जी आधीच जागतिक बाजारात आहे. या छोट्या कारची लांबी फक्त 2.9 मीटर असेल. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर कारला 3-डोर, 4-सीट्स मिळतील. त्यानुसार ही भारतातील सर्वात लहान चारचाकी वाहन असू शकते. या मिनी इलेक्ट्रिक कारमध्ये 20-25kWh चा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ते 300 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळवू शकते. कारची किंमत सुमारे 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.

Citroen Aircross SUVसिट्रॉएन लवकरच एक नवीन SUV लाँच करणार आहे, जी मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर सारख्या कारला टक्कर देईल. कंपनीच्या सध्याच्या हॅचबॅक Citroen C3 च्या धर्तीवर ही कार तयार करत आहे. मात्र, कारचा व्हीलबेस आणि लांबी जास्त असणार आहे.

Mahindra Tharमहिंद्रा आपल्या ऑफ-रोडर एसयूव्हीच्या नवीन बेस मॉडेलवर काम करत आहे. थारचा नवीन व्हेरिएंट AX AC या नावाने लाँच केला जाऊ शकतो. थारच्या सध्याच्या मॉडेल्सपेक्षा ही नवीन स्वस्त असणार आहे. मात्र, कमी किंमतीमुळे त्यात काही फीचर्स कमी असतील. नवीन थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनांचा पर्याय असेल. यापैकी एक 2.2 लिटर डिझेल आणि दुसरे 2.0 लिटर पेट्रोल इंजिन असणार आहे.

टॅग्स :AutomobileवाहनMaruti Suzukiमारुती सुझुकीcarकार