नवी दिल्ली : ईव्ही स्टार्टअप अल्ट्राव्हायोलेटने (Ultraviolette) दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक Ultraviolette F77 लाँच केली आहे. कंपनीने या बाइकचे तीन व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. कंपनीने या बाइकसाठी बुकिंग विंडो उघडली आहे आणि जानेवारी 2023 मध्ये बंगळुरू येथून या बाइकची डिलिव्हरी सुरू होईल.
Variantsअल्ट्राव्हायोलेटने ज्या तीन व्हेरिएंटमध्ये ही बाइक लाँच केली आहे, त्यामध्ये पहिला व्हेरिएंट एअरस्ट्राइक ( Airstrike), दुसरा व्हेरिएंट लेजर (Laser) आणि तिसरा व्हेरिएंट शॅडो (Shadow)आहे.
Priceअल्ट्राव्हायोलेट F77 (Ultraviolette F77) कंपनीने 3.80 लाख रुपयांच्या सुरूवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच केली आहे.
Bookingअल्ट्राव्हायोलेट F77 बाइक खरेदी करण्यासाठी ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ती बुक करू शकतात. कंपनीने बुकिंगसाठी 23,000 रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे.
Battery and Motorअल्ट्राव्हायोलेट F77 मध्ये 10.5 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हा बॅटरी पॅक IP67 रेटिंग केलेला आहे, जो बॅटरीचे पाणी आणि धूळ यांच्या प्रभावापासून संरक्षण करतो. हा बॅटरी पॅक 30 kWh पॉवर आणि 100 Nm पीक टॉर्क जनरेट करतो. याचबरोबर, अल्ट्राव्हायोलेट F77 मध्ये कंपनीने या बॅटरीच्या चार्जिंगबाबत दोन ऑप्शन दिले आहेत, ज्यामध्ये पहिला स्टँडर्ड चार्जर आणि दुसरा बूस्ट चार्जर आहे.
Range and Top Speedकंपनीचा दावा आहे की, अल्ट्राव्हायोलेट F77 सिंगल चार्जवर (टॉप व्हेरियंटमध्ये) 307 किमीची रेंज देते आणि या रेंजसह 150 किमी प्रति तासाचा टॉप स्पीड देते. तसेच, या बाइकच्या स्पीडबाबत कंपनीचा आणखी एक दावा असा आहे की, अल्ट्राव्हायोलेट F77 फक्त 3 सेकंदात 0 ते 60 किलोमीटर प्रति तास आणि 7 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते.
Ride Mode दरम्यान, अल्ट्राव्हायोलेट F77 मध्ये कंपनीने Glide Mode, Combat Mode and Ballistic Ride Mode असे तीन राइडिंग मोड दिले आहेत.