शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

TVS ची नवीन बाईक Ronin 225 उद्या होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 18:08 IST

TVS Ronin 225 Bike : लॉन्च होण्यापूर्वीच टीव्हीएसच्या या नवीन बाईकचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या आगामी बाईकचे फीचर्स आणि अपेक्षित किंमत, जाणून घेऊया...

नवी दिल्ली : टीव्हीएस (TVS) कंपनी 225 सीसी सेगमेंटमध्ये टीव्हीएस रॉनिन (TVS Ronin) बाईक उद्या (6 जुलै 2022) लाँच करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, लॉन्च होण्यापूर्वीच टीव्हीएसच्या या नवीन बाईकचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या आगामी बाईकचे फीचर्स आणि अपेक्षित किंमत, जाणून घेऊया...

नवीन TVS Ronin बाईक फुल- एलईडी लाइटिंगसह लॉन्च केली जाईल. यात गोल हेडलाइट, कॉम्पॅक्ट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्क्रॅम्बलर-स्टाइल डिझाईनसह टिअर-ड्रॉप शेप्ड फ्युल टँक, सिंगल-पीस सॅडल आणि साइड-स्लंग एक्झॉस्ट यासारखे स्टाइलिंग एलिमेंट नवीन मॉडर्न फीचर्स दिले आहेत, जे बाईकला आकर्षक आणि प्रीमियम डिझाइन देतात.

माहितीनुसार, या बाईकच्या हार्डवेअरमध्ये 223 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन दिले जाऊ शकते, ज्याचे आउटपुट जवळपास 20bhp आणि  20Nm पर्यंत टॉर्क अपेक्षित आहे आणि ज्यामध्ये एअर आणि ऑइल कूल्ड इंजिन सारखे फीचर्स असू शकतात. फोटोंवरून मिळालेल्या माहितीनुसार, या TVS बाईकच्या दोन्ही चाकांवर अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स, मागील मोनो-शॉक आणि डिस्क ब्रेक्स मिळतील.

टीव्हीएस आपल्या बजेट सेगमेंट बाईक्ससाठी भारतीय बाजारपेठेत अनेक वर्षांपासून खूप लोकप्रिय आणि सक्रिय आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, Zeppelin पॉवर क्रूझर मोटरसायकलची संकल्पना या टीव्हीएसने काही वर्षांपूर्वी ऑटो एक्सपोमध्ये दिसून आली होती, परंतु TVS Ronin चा लूक त्या संकल्पनेपेक्षा खूपच वेगळा दिसत आहे. 

या बाईकमध्ये अपराइट सीटिंग पोझिशन दिसेल. अतिशय कॉम्पॅक्ट दिसणारी ही बाईक डिझाईनच्या बाबतीत ट्रायम्फ ट्रायडंटसारखीच दिसते. याचबरोबर, या आगामी टीव्हीएस बाईकची किंमत उद्या लॉन्च झाल्यानंतर कळेल, परंतु तज्ज्ञांच्या मते, या बाईकची संभाव्य किंमत 1.50 लाख ते 1.60 लाख रुपये (सर्व किंमती, एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग