शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

परवडणाऱ्या किमतीत टीव्हीएसने लाँच केली नवीन स्कूटर, SmartXonnect टेक्नॉलॉजीने सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 19:29 IST

TVS Jupiter 110 ZX : नवीन TVS JUpiter 110 ZX ड्रम  SmartXonnect व्हेरिएंटची किंमत 84,468 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी Jupiter ZX डिस्क व्हेरिएंटपेक्षा 4,520 रुपये स्वस्त आहे.

नवी दिल्ली : टीव्हीएस (TVS) मोटर कंपनीने आपल्या SmartXonnect टेक्नॉलॉजीला अधिक परवडणाऱ्या व्हेरिएंटमध्ये आणत नवीन ज्युपिटर 110 ZX ड्रम (TVS JUpiter 110 ZX) व्हेरिएंट लाँच केली आहे. नवीन TVS JUpiter 110 ZX ड्रम  SmartXonnect व्हेरिएंटची किंमत 84,468 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी Jupiter ZX डिस्क व्हेरिएंटपेक्षा 4,520 रुपये स्वस्त आहे. यामध्ये अनेक कनेक्टेड फीचर्स उपलब्ध आहेत.

नवीन TVS Jupiter ZX ड्रम SmartXonnect व्हेरिएंटमध्ये ब्रँडच्या SmartXonnect टेक्नॉलॉजीसह नवीन ब्लूटूथ-सक्षम डिजिटल कन्सोल मिळतो. कंपनीने TVS NTorq सह इतर मॉडेल्सवर हे युनिट आधीच सादर केले आहे. तसेच, SmartXonnect टेक्नॉलॉजी टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, व्हॉइस असिस्ट, कॉल आणि एसएमएस अलर्ट यांसारखी फीचर्स ऑफर करते. या व्यतिरिक्त, या व्हेरिएंटमध्ये स्मार्टफोनसाठी बिल्ट-इन USB चार्जिंग देखील मिळते. नवीन SmartXonnect व्हेरिएंटमध्ये स्टारलाईट ब्लू शेडसह नवीन ऑलिव्ह गोल्ड कलर स्कीम मिळते.

TVS Jupiter 110 ZX चे इंजिनया स्कूटरमध्ये 109.7 सीसी सिंगल-सिलिंडर, फ्यूल इंजेक्शनसह एअर-कूल्ड इंजिन देण्यात आहे आहे. हे पॉवरट्रेन 7,500 आरपीएमवर 7.7 बीएचपी पॉवर आणि 5,500 आरपीएमवर 8.8 एनएमचे पीक टॉर्क विकसित करते, जे CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. ZX ड्रम ब्रेकमध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमसह दोन्ही टोकांना 130 मिमी ड्रम ब्रेक मिळतात. स्कूटरला पुढील आणि मागील बाजूस 12-इंच ट्यूबलेस टायर मिळतात.

TVS Jupiter ची किंमत TVS Jupiter रेंज बेस ट्रिमसाठी 73,240 रुपयांपासून सुरू होते आणि Jupiter Classic व्हेरिएंटसाठी 89,648 रुपयांपर्यंत जाते. या सर्व किंमती एक्स-शोरूम, दिल्लीमधील आहेत. TVS Jupiter ही देशात विकली जाणारी सर्वात लोकप्रिय स्कूटर आहे आणि Honda Activa नंतर दुसरी सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. परवडणाऱ्या या व्हेरिएंटमुळे ग्राहक आकर्षित होतील आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी शक्यता आहे. 

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड