शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

'या' इलेक्ट्रिक स्कूटरने तोडले सर्व रेकॉर्ड; मार्केटमध्ये ग्राहकांकडून मिळतेय चांगली पसंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 11:16 IST

TVS कंपनीच्या स्कूटरला भारतीय बाजारपेठेत चांगलीच पसंती मिळत आहे.

नवी दिल्ली : देशातील इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी आता हळूहळू वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक स्कूटरच्या विक्रीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत TVS ची अशी इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याची मागणी खूप वेगाने वाढत आहे. या कंपनीच्या गेल्या 8 महिन्यांत इलेक्ट्रिक स्कूटरच्या 50 हजारांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. TVS कंपनीच्या स्कूटरला भारतीय बाजारपेठेत चांगलीच पसंती मिळत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर दिसायला खूपच जबरदस्त आहे. त्याची रेंजही खूप चांगली आहे आणि किंमतही जास्त नाही.

दरम्यान, ही TVS मोटर कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर iQube आहे. स्कूटरचे अपडेट व्हर्जन मे 2022 मध्ये लाँच करण्यात आले होते. अपडेटेड TVS iQube मध्ये अनेक फीचर्स आणि रेंजसह बाजारात आणली आहे. ही स्कूटर स्टँडर्ड आणि एस या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, तर जास्त रेंजचे एसटी मॉडेल अद्याप विक्रीसाठी बाजारात आणले नाही. काही दिवसांपूर्वीच ऑटो एक्सपोमध्ये हे लॉन्च करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 88 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 1.2 लाख रुपयांपर्यंत जाते.

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्टँडर्ड आणि एस मॉडेल्समध्ये 3.4 kWh बॅटरी मिळते, जी सिंगल चार्जवर 100 किमीची रेंज देऊ शकते. याशिवाय, iQube ST ला स्कूटरच्या टॉप मॉडेलमध्ये मोठी 5.1 kWh बॅटरी मिळते, जी सिंगल चार्जवर 140 किमीची रेंज देते. इलेक्ट्रिक स्कूटर 3 किमी चालवण्याचा खर्च एक रुपयापेक्षा कमी येतो. इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी धूळ आणि पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित आहे. यात स्वदेशी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) आणि थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम मिळते, ज्यामुळे आगीचा धोकाही कमी होतो.

शानदार फीचर्स...या TVS इलेक्ट्रिक स्कूटरला पॉवर हब-माउंटेड BLDC इलेक्ट्रिक मोटर मिळते, जी 6 bhp आणि 140 Nm पॉवर आउटपुट देते. स्कूटरचा कमाल टॉप स्पीड 82 किमी प्रतितास आहे. याशिवाय स्कूटरमध्ये अनेक प्रकारचे सेफ्टी फीचर्सही देण्यात आले आहेत. ज्यामध्ये नवीन इनएक्टिव्ह मोडचा समावेश आहे. तसेच, स्कूटरला 11 नवीन कलर ऑप्शन, USB चार्जिंग पोर्ट, नेव्हिगेशनसह 5-इंचाची TFT स्क्रीन आणि मोठ्या मॉडेलमध्ये 7-इंच स्क्रीन आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन