TVS iQube मिडनाईट कार्निवल; या काळात खरेदी करा आणि 100% कॅशबॅक मिळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 16:27 IST2024-12-13T16:09:41+5:302024-12-13T16:27:59+5:30

भारताची आवडती कौटुंबिक ईव्ही TVS iQube ही अत्यंत आरामदायी, सोयी-सुविधांनी सज्ज आणि स्मार्ट तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे.

TVS iQube Midnight Carnival Buy during this period and get 100% cashback | TVS iQube मिडनाईट कार्निवल; या काळात खरेदी करा आणि 100% कॅशबॅक मिळवा!

TVS iQube मिडनाईट कार्निवल; या काळात खरेदी करा आणि 100% कॅशबॅक मिळवा!

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात TVS iQube ने ४.५ लाख युनिट विक्रीचा टप्पा पार केला आहे. त्याचं सेलिब्रेशन म्हणून कंपनीने १२ ते २२ डिसेंबर या काळात आयोजित केलेला ‘मिडनाईट कार्निव्हल’ दहा रात्री उजळून टाकणार आहे. भारताची आवडती कौटुंबिक ईव्ही TVS iQube ही अत्यंत आरामदायी, सोयी-सुविधांनी सज्ज आणि स्मार्ट तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून हे सर्व काही केवळ ₹94,999 (एक्स-शोरूम दिल्ली) रुपयांत मिळत आहे.

तुम्ही हा कार्निव्हल का चुकवू नये: जिंका 100% कॅशबॅक - प्रत्येक दिवशी, एक ग्राहक त्याची TVS iQube मोफत घरी आणेल; विजेते नसलेल्यांना ₹30,000 रुपयांपर्यंतचे निश्चित फायदे मिळतील

>> मध्यरात्रीही बुकिंग सुविधा – सर्व डीलरशिप मध्यरात्रीपर्यंत खुल्या राहतील. जेणेकरून तुम्ही तुमच्या वेळेनुसार स्कूटर बुक करू शकता.

>> ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग – तुम्ही तुमची TVS iQube डीलरशिपवर किंवा अधिकृत TVS iQube वेबसाइटवरून ऑनलाइन बुक करू शकता.

>> विशेष 10-दिवसीय उत्सव - इलेक्ट्रिकवर स्विच करण्यासाठी आणि इतर कोणत्याही उत्सवकाळातील खरेदीसारखाच आनंद घेण्यासाठी योग्य वेळ.

>> खरेदी होईल स्पेशल - ज्या ग्राहकांनी आधी बुकिंग केले आहे ते देखील ऑफरसाठी पात्र असतील. जर या ग्राहकांनी या १० दिवसांच्या काळात त्यांची खरेदी पूर्ण केली असेल तर ही ऑफर त्यांच्यासाठी लागू राहणार आहे.

TVS iQube भारतीयांची सर्वाधिक पसंतीची फॅमिली ईव्ही कशी बनली....

150 किमीची रिअल रेंज...

150 किमी रिअल-वर्ल्ड रेंजसह प्रत्येक प्रवासात खरे स्वातंत्र्य अनुभवता येते. तुम्ही कामावर जात असाल, काम करत असाल किंवा सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जात असाल तरी, TVS iQube ची बॅटरी संपेल का, याची काळजी करायची अजिबात गरज नाही. वारंवार रिचार्ज करण्याची चिंता न करता आत्मविश्वासाने ही स्कूटर दूरपर्यंत चालविता येते.

फास्ट चार्जिंग...0 ते 80% बॅटरी 2:30 तासांमध्ये

फास्ट चार्जिंगमुळे तुम्हाला बराच वेळ वाट पाहण्याची गरज नाही. यामुळे तुम्ही लवकर पुन्हा रोडवर स्कूटर चालवू शकता. फक्त 2:30 तासांमध्ये, तुम्ही 0 ते 80% पर्यंत बॅटरी चार्ज करू शकता. यामुळे ही स्कूटर बिझी वेळापत्रकांसाठी योग्य ठरते. प्रतीक्षा करण्यात कमी वेळ आणि राईडचा आनंद घेण्यात जास्त वेळ देता येतो |

स्मार्ट प्रवासासाठी 118+ कनेक्टेड टेक वैशिष्ट्ये

नॅव्हिगेशनपासून ते जिओफेन्सिंग आणि व्हॉईस कमांड्ससारख्या 118+ कनेक्टेड फीचर्ससह, TVS iQube तुम्हाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सामर्थ्यवान बनवते जे सुरक्षितता, सुविधा आणि एकूण सफरीचा अनुभव वाढवते.

7-इंच टचस्क्रीन क्लस्टर – नॅव्हिगेट करा, कनेक्ट करा आणि स्मार्ट राइड करा

TVS iQube मध्ये 7-इंच टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात नॅव्हिगेशन, कॉल आणि मेसेज अलर्ट, म्युझिक कंट्रोलची व्यवस्था आहे. त्यामुळे प्रत्येक राइड अधिक आनंददायक, कनेक्टेड आणि कार्यक्षम बनते.

32L अंडर-सीट स्टोरेज, प्रशस्त फूटबोर्ड...

सीटखाली प्रशस्त अशी ३२ लीटर स्टोरेज स्पेस आणि रुंद फुटबोर्डसह प्रशस्थ डिझाईन करण्यात आलेली आहे. यात तुमचे हेल्मेट, किराणा सामान, पिशव्या किंवा जीवनावश्यक वस्तू सहज ठेवता येतात. यामुळे TVS iQube दैनंदिन कौटुंबिक गरजा आणि कामांसाठी योग्य साथीदार बनते.

अशी ही अद्वितीय वैशिष्ट्ये तुमच्या कुटुंबासाठी अतुलनीय सुविधा, सुरक्षितता आणि स्मार्ट कनेक्टिव्हीटी ऑफर करतात. या सगळ्या गोष्टी TVS iQubeला भारतीयांची पसंतीची फॅमिली ईव्ही बनवते.

विकत घेणेही सोपे...

TVS iQubeस्कूटर तुम्ही सोप्या पर्यांयांनी स्वतःच्या मालकीची करू शकता. १२ महिन्यांचा नो कॉस्ट ईएमआय, ७९९९ एवढे कमी डाऊन पेमेंट आणि कमी व्याजदराची सोय यामुळे तुम्ही तुमची स्कूटर खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकता.

संधी सोडू नका...

हा मिडनाईट कार्निव्हल इव्हेंट मर्यादित काळासाठी आहे. तुमच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी आणि मोफत TVS iQube घरी आणण्याची ही योग्य संधी आहे.

चला तर मग, तुमचे कॅलेंडर घ्या आणि त्यात १२-२२ डिसेंबर या तारखा चिन्हांकित करून ठेवा, ऑनलाइन बुक करा किंवा तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट द्या

अटी व शर्ती लागू...

#AbHarDinHuaAasan

Web Title: TVS iQube Midnight Carnival Buy during this period and get 100% cashback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.