शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

TVS iQube इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि रेंज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 17:17 IST

TVS iQube electric scooter: भारतीय बाजारात टीव्हीएसच्या या स्कूटरची स्पर्धा Bajaj Chetak आणि Ather च्या इलेक्ट्रीक स्कूटरसोबत होणार आहे. 

दुचाकीमध्ये आणि खासकरून स्कूटर सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या टीव्हीएस (TVS Motor Company) ने iQube इलेक्ट्रीक स्कूटर दिल्लीमध्ये लाँच केली. सुरुवातीला ही स्कूटर काही मोजक्याच डिलरकडे मिळणार आहे. टीव्हीएसने या स्कूटरला 3 वर्षे किंवा 50000 किमींची वॉरंटी दिली आहे. कंपनी ही स्कूटर लवकरच देशातील अन्य शहरांतही उपलब्ध करणार आहे. (TVS iQube electric scooter launched in delhi after bengluru)

भारतीय बाजारात टीव्हीएसच्या या स्कूटरची स्पर्धा Bajaj Chetak आणि Ather च्या इलेक्ट्रीक स्कूटरसोबत होणार आहे. TVS iQube ची दिल्लीतील किंमत 1,08,012 रुपये आहे. या स्कूटरची एक्स-शोरुम किंमत 1,36,077 रुपये आहे. मात्र,FAME स्कीम आणि दिल्ली सरकार देत असलेली सबसिडी पाहता ही स्कूटर लाखाच्या आसपास जाणार आहे. TVS ने ही स्कूटर आधी बंगळुरूपुरतीच लाँच केली होती. याठिकाणी तिची किंमत 1,15,000 रुपये होती. कोरोना काळात ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचा दावा टीव्हीएसने केला आहे. 

E-Scooter Mileage TIPS: इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज कशी वाढवाल? ही काळजी घ्या...

 

बॅटरी आणि रेंजटीव्हीएसच्या आयक्यूबला 4.4 kW ची मोटर देण्यात आली आहे. ही मोटर स्कूटरला 4.2 सेकंदांत 40 किमी प्रति तासाचा वेग देते. या स्कूटरची टॉप स्पीड 78 किमी प्रति तास आहे. यामध्ये 2.25kWh ची क्षमतेची lithium-ion बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फूल चार्ज केल्यावर ही स्कूटर एकावेळी 75 किमी धावू शकते. ही स्कूटर चार्ज करण्यासाठी 5 तास लागतात. 

मॅन्युअल गिअरची कार चालविताना या चुका करू नका; नाहीतर होईल मोठे नुकसान...

या स्कूटरमध्ये टीव्हीएसने जेनरेशन TVS SmartXonnect दिली आहे. यामध्ये अॅडव्हान्स टीएफटी क्लस्टर आणि टीव्हीएस आयक्यूब अॅपही मिळते. याद्वारे जिओ फेसिंग, नेव्हिगेशन असिस्ट, रिमोट बॅटरी चार्ज स्टेटस. लास्ट पार्क लोकेशन, कॉल अलर्ट, तसेच डेनाईट डिस्प्ले, क्यू पार्क असिस्ट, मल्टी सिलेक्ट इकॉनमी आणि पॉवर मोड सारखेच फिचर देण्यात आले आहेत. 

इलेक्ट्रीक वाहन घेण्याचे फायदेच अधिक; तोटे फक्त २...जाणून घ्या...

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड