शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

New Traffic Rules: विनाहेल्मेट, सीट बेल्टशिवाय प्रवास करताय? नवे नियम आणि दंड वाचा, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 07:26 IST

New Traffic Rules, penalties in Maharashtra Soon: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने हे बदल केले जाणार आहेत. परिवहन विभागाने त्यास मंजुरी दिली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना चाप बसवा यासाठी पुढील आठवड्यापासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानुसार हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. विनापरवाना वाहन चालवल्याचा दंड पाच पटीने वाढवून १० हजार करण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने हे बदल केले जाणार आहेत. परिवहन विभागाने त्यास मंजुरी दिली आहे. 

फॅन्सी नंबर प्लेटवरही होणार कारवाईअनेकांना दादा, मामा, बाबा अशा नावानी नंबर प्लेट गाड्यांना लावण्याची सवय असते. मात्र, बाईकस्वारांना आता या सवयीला मुरड घालावी लागणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट लावणे वाहनचालकांना महागात पडणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट असल्यास वाहनचालकांनाही १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद नव्या नियमामध्ये करण्यात आली आहे. फॅन्सी नंबर प्लेटसाठी, रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास, हेल्मेट नसल्यास तसेच सीटबेल्ट नसल्यास चालकांना १ हजार रुपये दंड आकारला जाईल. विनाहेल्मेट दुचाकीस्वाराचा परवाना तीन महिन्यासाठी रद्दही केला जाणार आहे. नवीन नियमांची नोटीस जारी केली जाईल, असे परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

...तर १० हजार रुपये दंडमद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर न्यायालयीन कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. नवीन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ६ महिने तुरुंगवास आणि किंवा १० हजार रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. तर दुसऱ्यांदा अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास २ वर्षे तुरुंगवास आणि किया २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला जाणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाच्या आधारे नवीन नियम लागू होणार आहेत.

असा असेल दंड

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीस