शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

Toyota ची अर्बन क्रूझर सादर; थेट मारुतीच्या ब्रिझाला टक्कर देणार

By हेमंत बावकर | Updated: September 28, 2020 09:51 IST

टोयोटा आणि मारुती सुझुकीमध्ये झालेल्या करारानुसार ही कार बनविण्यात आली आहे. सुझुकीची बलेनो टोयोटाने ग्लान्झा या नावाने रस्त्यावर आणली होती. या कारनंतर टोयोटाने दुसरी कार आणली आहे. 

बंगळुरू : टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने नुकतीच बहुप्रतीक्षित कॉम्पॅक्ट एसयुव्ही टोयोटा अर्बन क्रूझर भारतात लाँच केली आहे. ही एसयुव्ही मारुतीच्या ब्रिझाला थेट टक्कर देणार आहे.  

टोयोटा आणि मारुती सुझुकीमध्ये झालेल्या करारानुसार ही कार बनविण्यात आली आहे. सुझुकीची बलेनो टोयोटाने ग्लान्झा या नावाने रस्त्यावर आणली होती. या कारनंतर टोयोटाने दुसरी कार आणली आहे. 

ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार'

नवीनतम अर्बन क्रुजरमध्ये नवीन शक्तिशाली के-सिरीज इंजिन आहे. हे १.५ लीटरचे चार सिलेंडर वाले पेट्रोल इंजिन आहे ज्यामध्ये इंधन कार्यक्षमतेसाठी मॅन्युअल ट्रांसमिशन (एमटी) १७.०३ केएमपीएल आणि ऑटोमेटिक ट्रांसमिशन (एटी) १८.७६ केएमपीएल असे दोन पर्याय देखील उपलब्ध आहे. कॉम्पॅक्ट एसयूवीमध्ये सर्वोच्च वैशिष्टये आहेत ज्याची मागणी आजचा प्रत्येक ग्राहक त्यांच्या कारसाठी करतो. याव्यतिरिक्त, हे तरुणांना टोयोटा एसयूवी कुटुंबात लवकर प्रवेश करण्याची संधी देते आणि टोयोटाच्या विक्री आणि विक्रीनंतरच्या प्रसिद्ध जागतिक मानकांचा अनुभव देखील प्रदान करते. नेहमीप्रमाणेच टोयोटासाठी ग्राहकांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे. या अर्बन क्रूजरमध्ये ड्युअल एयरबॅग्स, आणि ईबीडीसह एबीएस अँडवांस बॉडी स्टक्चर इलेक्ट्रोक्रोमिक आईआरवीएम, हिल होल्ड कंट्रोल,ऑडिओमध्ये डिसप्लेसह रीवर्स पार्किंग कॅमेरा आणि आईएसओएफआईएक्स चाइल्ड सीट रेसट्रेन्ट सिस्टमसह उपलब्ध आहे.

रिस्पेक्ट पॅकेजअर्बन क्रूजरची बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना फायदा व्हावा म्हणून अलीकडेच कंपनीने एका रिस्पेक्ट पॅकेजची घोषणा केली होती. याअंतर्गत, दोन वर्षे किंवा २०,००० किलोमीटर पर्यंत नियमित मेंटेनन्ससाठी पैसे घेतले जाणार नाहीत. या कारचे बुकिंग सुरु झाले आहे.  

किया सोनेट नवा भिडू

दक्षिण कोरियाची कंपनी कियाने भारतात दमदार एन्ट्री केली आहे. गेल्या वर्षी ऐन मंदीतही कंपनीने एसयुव्ही लाँच करून विक्रीचा धमाका केला होता. आता कियाने छोट्या एसयुव्हीच्या सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. Kia ने आज बहुप्रतिक्षित किया सोनेट (Kia Sonet) भारतात लाँच केली असून किंमतही खूप कमी ठेवली आहे. तसेच फिचरही बरेच सारे एसयुव्हीमध्ये असलेले दिले आहेत. 

बहुप्रतीक्षित Kia Carnival MPV आली; मध्यमवर्गाची लिमोझिनच जणू

किया सोनेटची सुरुवातीची किंमत 6.71 लाख रुपये असून टॉप मॉडेलची किंमत 11.99 लाख रुपये आहे. कंपनीने पहिल्या वर्षात 1 लाखाहून अधिक विक्री करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. Kia Sonet ची लांबी 3995mm, रुंदी 1790mm आणि उंची 1610mm आहे. ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही HTE, HTK, HTK+, HTX, HTX+ आणि GTX+ ट्रीममध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच ही कार 8 मोनोटोन कलरमध्ये उपलब्ध असेल. कियाने एसयुव्ही सेगमेंटमध्ये भल्या भल्या कंपन्यांना मागे टाकले असून आता सोनेटमुळे तिचा मुकाबला  Hyundai वेन्यू, Maruti ब्रेजा, Mahindra XUV300, Ford EcoSport आणि भारताची सर्वात सुरक्षित कार Tata Nexon सोबत होणार आहे. 

टॅग्स :ToyotaटोयोटाMaruti Suzukiमारुती सुझुकी